संगमेश्वर ते बावनदी दरम्यान ‘डायव्हर्जन’चा सापळा
-rat८p१७.JPG-
२६O२९५१७
संगमेश्वर ः मुंबई–गोवा महामार्गावर संगमेश्वर ते बावनदी दरम्यान डायव्हर्जनमुळे अपघातांची संख्या वाढत आहे.
----
महामार्ग चौपदरीकरणात सुरक्षेला हरताळ
संगमेश्वर-बावनदी दरम्यान सूचनेविना ‘डायव्हर्जन’; अपघाताचे धोके
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता.९ : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना संगमेश्वर ते बावनदी दरम्यान अत्यंत धोकादायक पद्धतीने वाहतुकीत बदल केले जात आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक रस्ता बंद करून नवीन ‘डायव्हर्जन’ (पर्यायी मार्ग) तयार केले जात असल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, भीषण अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
महामार्गाच्या कामासाठी अनेक ठिकाणी मूळ रस्ता बंद करून वाहने पर्यायी मार्गाने वळवली जात आहेत. मात्र, या वळणांवर आवश्यक सूचना फलक, रिफ्लेक्टर्स किंवा रात्रीच्या वेळी प्रकाशयोजना नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. वेगवान वाहनांना अचानक वळण घ्यावे लागत असल्याने चालकाचा ताबा सुटून वाहने पलटी होण्याचे किंवा एकमेकांवर आदळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
सध्या संगमेश्वर परिसरात सर्वाधिक डायव्हर्जन करण्यात आले आहेत. अरुंद पर्यायी मार्ग आणि अवजड वाहनांची वर्दळ यामुळे या भागात तासनतास वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. दुचाकी आणि चारचाकी चालकांना तर या अचानक बदललेल्या मार्गांमुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडून सुरक्षेच्या नियमांना हरताळ फासला जात असल्याचा आरोप वाहनचालक करत आहेत.
----
नियोजनाची मागणी
स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी प्रशासनाकडे याप्रश्नी तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. संबंधित ठेकेदाराने योग्य सूचना फलक लावल्याशिवाय आणि पुरेशी प्रकाशयोजना केल्याशिवाय रस्ता बंद करू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. अपघात टाळण्यासाठी महामार्ग पोलिस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

