वेळेत तपासणी केल्यास कर्करोगावर मात करता येते
rat8p12.jpg
29512
रत्नागिरी ः जिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. विकास कुमरे. सोबत डावीकडून अमोल डोंगरे, राजेश कळंबटे, डॉ. शिरसाट आणि अन्य.
rat8p16.jpg
29513
रत्नागिरी ः महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित महिला.
rat8p18.jpg
29523
रत्नागिरी ः महिलांचा सत्कार करताना डॉ. विकास कुमरे.
वेळेत तपासणी केल्यास कर्करोगावर मात करता येते
डॉ. विकास कुमरे ; जिल्हा रुग्णालय, ‘सकाळ’द्वारे महिला दिनी कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : योग्य वयात आणि वेळेत तपासणी केल्यास कर्करोगावर मात करून आयुर्मान वाढवणे शक्य आहे. त्यामुळे कर्करोग विषयक तपासणी करून घेऊन स्वतःची आणि कुटुंबाची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि ‘सकाळ’ यांच्यावतीने राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ते बोलत होते. याप्रसंगी महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करणे व एचपीव्ही (HPV) लसीकरणाविषयी माहिती देणे, असा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, समुपदेशक रामेश्वर म्हेत्रे, राम चिंचोळे, परिसेविका आरती काळगे, सचिन भरणे, प्राजक्ता राजेशिर्के, सोनाली जाधव, तर ‘सकाळ’तर्फे उपसंपादक राजेश कळंबटे, जाहिरात प्रतिनिधी संजय पंडित, वितरण प्रतिनिधी अमोल डोंगरे आदी उपस्थित होते.
यावेळी परिचारिका समीक्षा दैत यांनी गर्भाशयाचा व स्तन कर्करोग याविषयी माहिती दिली. तसेच उपस्थित महिलांची रक्तदाब आणि रक्तातील शर्करा तपासणी करण्यात आली. परिचारिका माया सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी डॉ. कुमरे म्हणाले, महिलांमध्ये कर्करोगाचे (विशेषतः गर्भाशयाचा आणि स्तनाचा कर्करोग) प्रमाण वाढत आहे. कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी शासनामार्फत लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, लसीकरणाचे प्रमाण सध्या कमी असल्याने महिलांनी या सुरक्षेसाठी स्वतःहून पुढाकार घेणे गरजेचे आहे. ‘सशक्त नारी, सशक्त परिवार’ यांसारख्या योजनांमधून महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. तसेच, कर्करोग तपासणीसाठी विशेष ‘मोबाईल व्हॅन’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याद्वारे ठिकठिकाणी मोफत तपासणी केली जात आहे. योग्य वयात आणि वेळेत तपासणी केल्यास कर्करोगावर मात करून आयुर्मान वाढवणे शक्य आहे. आपल्याकडील स्त्रिया अनेकदा संकोचामुळे तपासणीसाठी प्रतिसाद देत नाहीत. मात्र, आपले आरोग्य ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे कॅन्सर तपासणी करून घेऊन स्वतःची आणि कुटुंबाची योग्य काळजी घ्यावी. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून संस्थेला आवश्यक वैद्यकीय साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

