अत्याधुनिक सभागृह स्थानिक कलाकारांसाठी समर्पित
रत्नागिरीत कलाकारांना हक्काचे दालन
नूतन सभागृहाचे उद्घाटन; लोककला कार्यक्रमांची रंगत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः रत्नागिरीतील स्थानिक कलाकारांच्या हक्काच्या व्यासपीठाची प्रतीक्षा आता संपली आहे. रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील नूतनीकृत आणि अत्याधुनिक सभागृह आजपासून स्थानिक रत्नागिरीकर कलाकारांसाठी समर्पित करण्यात येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
शनिवार (ता. ७) रात्री कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्र येथे आयोजित नूतन सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि वेद्पाठशाळेतील विद्यार्थ्यांच्या मंगल मंत्रोच्चारात कोनशिलेचे अनावरण व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. याप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील ‘बी. ए. परफॉर्मिंग आर्ट्स’च्या विद्यार्थ्यांनी प्रा. आनंद आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोककला, भारुड आणि लोकगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. तसेच नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले.
यावेळी राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयात प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या मिनार गजानन पाटील याचे पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. तसेच प्रा. आनंद आंबेकर आणि डॉ. शशांक पाटील यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री सामंत म्हणाले, ‘रत्नागिरीत कलाकारांसाठी एका अत्याधुनिक सभागृहाची गरज होती. ही गरज ओळखून अत्यंत कमी कालावधीत हे सभागृह सज्ज करण्यात आले आहे. या माध्यमातून रत्नागिरीच्या समृद्ध संस्कृतीला आणि कलाविश्वाला नवे बळ मिळेल.’
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, डॉ. राजश्री देशपांडे, प्राचार्य कीर्तिकुमार भोसले, समीर इंदुलकर, अनिल दांडेकर यांच्यासह नगरसेवक, कलाकार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर डॉ. मराठे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

