सावर्डे विद्यालयात नारीशक्तीचा सन्मान

सावर्डे विद्यालयात नारीशक्तीचा सन्मान

Published on

rat8p21.jpg-
29535
सावर्डे : विद्यालयातील महिलांचा सन्मान करताना प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण.
-----------
सावर्डे विद्यालयात नारीशक्तीचा सन्मान
सावर्डे ः भारतीय संस्कृतीत महिलांना मानाचे स्थान असून संविधानाने दिलेल्या अधिकारांमुळे महिलांनी अनेक क्षेत्रांत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या प्रगतीचा आदर्श विद्यार्थिनींनी शालेय जीवनातच डोळ्यासमोर ठेवावा, असे प्रतिपादन प्राचार्य राजेंद्र वारे यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी विद्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. तसेच महिला दिनी वाढदिवस असलेल्या विद्यार्थिनींचाही गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. अमृता घाग यांनी महिला सबलीकरण विषयावर विविध उदाहरणांच्या आधारे मार्गदर्शन करत महिलांच्या योगदानाचा आढावा घेतला.
.............
राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत
योगीराज पाकळे रौप्यपदक
सावर्डे, ता. ८ : डेरवण यूथ गेम्स २०२६ या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सोळा वर्षाखालील ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील योगीराज हेमंत पाकळे याने बारा वर्षे वयोगटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्यपदकाला गवसणी घातली.
या स्पर्धेत राज्यातील बारा वर्षे वयोगटातील तब्बल १०६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा फिडे रॅपिड पद्धतीने घेण्यात आल्या. योगीराजचे आई-वडील दोघेही शिक्षक असून ते उत्तम बुद्धिबळ खेळाडू आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच त्याला बुद्धिबळाचे बाळकडू मिळाले. यापूर्वीही त्याने रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित रत्नागिरी व खेड येथील जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. योगीराजला विद्यालयाच्या क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या राज्यस्तरीय यशाबद्दल आमदार शेखर निकम, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण आदींनी अभिनंदन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com