खजुराच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ

खजुराच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ

Published on

-rat८p१९.JPG-
२६O२९५२४
चिपळूण ः क्वालिटी बेकरीमध्ये रमजानच्या निमित्ताने विविध प्रकारचे खजूर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
----
चिपळुणात खजुराच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ
रमजान महिना ; बदाम, सुकामेव्याला मागणी, आखातीला युद्धाचाही परिणाम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ ः रमजानच्या पार्श्वभूमीवर येथील दुकानांत खजूर, बदाम, ड्रायफ्रुटसला मागणी वाढली आहे. यंदा खजुरांच्या दरात सरासरी दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. विविध देशांतील खजूर उपलब्ध झाले आहेत. पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम धर्मीयांकडून उपवास केले जातात. त्यामुळे खजूर, काजू, बदाम, बेदाणा, चारोळी, पिस्ता, अंजीर, अक्रोड, केशर, खोबरे आदी प्रकारच्या सुकामेव्याला मोठी मागणी असते.
बहुतांश सुकामेवा अमेरिका आणि आखाती देशांमधून भारतात आयात होतो. यंदा रमजान महिन्यातच अमेरिका-इराणयुद्धाचा भडका उडाल्याने आयातीवर परिणाम होत आहे. यामुळे सुकामेव्याच्या किमती १५ ते २० टक्के वाढल्या आहेत. युद्ध लांबल्यास आणखी दरवाढ होण्याचा धोका आहे. रमजान महिन्यात मुस्लीम धर्मीयांकडून केल्या जाणाऱ्या उपवासानंतर आहारात सुकामेव्याचा वापर केला जातो. या काळातील वाढती मागणी लक्षात घेऊन विक्रेते १५ ते २० दिवस आधीच सुकामेव्याची मागणी करतात. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात सुकामेवा उपलब्ध असल्याने बाजारपेठा बहरल्या आहेत. रमजानमध्ये विविध प्रकारची मिठाई तयार केली जाते. यात सुकामेवा वापरला जातो. तसेच दैनंदिन आहार आणि भेटवस्तू देतानाही सुकामेव्याचा वापर केला जातो. यामुळे याच्या मागणीत ३० ते ३५ टक्के वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेले युद्ध आखाती देशांमध्ये भडकले आहे. विमान आणि जहाजांचे मार्ग जवळपास बंद झाले आहेत. यामुळे आयातीवर मोठा परिणाम होत आहे. मोठ्या व्यापाऱ्यांकडील सुकामेव्याचे साठे संपत आले आहेत. त्यामुळे दरवाढ झाली आहे.
अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात पिस्ते आणि बदामाची आवक होते. अफगाणिस्तानातून पिस्ता, जर्दाळू येतात. ऑस्ट्रेलियातून बदाम आणि पिस्ते येतात. चिली आणि अमेरिकेतून अक्रोडाची आवक होते. इराण, अफगाणिस्तानमधून अंजिराची आयात होते. सौदी अरेबिया, ट्युनिशिया आणि काही आखाती देशांमधून खजुराची आयात केली जाते.
-----------
बाजारात दर असे
सुकामेवा* प्रतिकिलो दर
खजूर* १२० ते ४०००
बदाम* ८०० ते १०००
पिस्ता* १९०० ते २५००
अक्रोड* १२०० ते १६००
अंजिर* १२०० ते १४००
बेदाणे* ४५० ते ६००
जर्दाळू* ५०० ते ६००
-----------
कोट
रमजान महिन्यामुळे ड्रायफ्रुटला मागणी आहे. खजुरांचे नऊ ते दहा प्रकार उपलब्ध आहेत. इराण, ओमान, सौदी अरेबिया देशातील खजुरांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. इराणी (सुलताना), ओमानी, सौदी (कलमी), इराकी, किमिया, सुकी प्रकारातील खजूर उपलब्ध आहेत. बदाम, चारोळी, अंजीर, खारीक या ड्रायफ्रुटसचे दर स्थिर आहेत.
- मोहन नायर, क्वालिटी बेकरी, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com