केळशीतील समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
29537
समाधान शिबिराला
केळशीत उत्स्फूर्त प्रतिसाद
दापोली, ता. ८ : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्याला दापोली तालुक्यातील केळशी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये सुमारे ५५० ते ६०० नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला, अशी माहिती तहसीलदार अर्चना बोंबे यांनी दिली.
महसूल विभागामार्फत सातबारा, ८ अ व फेरफार वाटपाची ७२१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच ४६६ विविध दाखले देण्यात आले. जमिनीच्या सातबारा उताऱ्यातील दुरुस्तीचे ७५ अर्ज प्राप्त झाले, तर वारस तपासणीचे ९० अर्ज व ३३ फेरफार निर्गत करण्यात आले. शिधापत्रिकेशी संबंधित ७१ कामांचा निपटारा करण्यात आला असून वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासाठी ६३ अर्ज स्वीकारण्यात आले. आरोग्य विभागामार्फत ८० नागरिकांची आरोग्य तपासणी व ३३ जणांची रक्त तपासणी करण्यात आली. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ३ लाभार्थ्यांना बेबी केअर कीट देण्यात आले असून मातृवंदना योजनेचे ३ अर्ज स्वीकारण्यात आले. याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचे ९ अर्ज व निवडणूक ओळखपत्राशी संबंधित ४० अर्ज प्राप्त झाले. शेतकरी योजनांमध्ये ३८ ॲग्री स्टॅक नोंदणी, ६ महाडीबीटी अर्ज तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेचे २ अर्ज स्वीकारण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

