सावंतवाडीत ‘फिटनेस योग’तर्फे 
शंभरी पार आजीबाईंचा सत्कार

सावंतवाडीत ‘फिटनेस योग’तर्फे शंभरी पार आजीबाईंचा सत्कार

Published on

29569

सावंतवाडीत ‘फिटनेस योग’तर्फे
शंभरी पार आजीबाईंचा सत्कार
बांदा ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत फिटनेस योग फाउंडेशन, फिटनेस महिला ॲकॅडमी सिंधुदुर्गतर्फे सावंतवाडी येथे रविवारी सकाळी ‘शंभरी पार महिलांचा सत्कार’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत योगसाधकांनी वयोवृद्ध आजींच्या घरी जाऊन त्यांचे औक्षण करत त्यांचा सन्मान केला. स्त्री ही आई, बहिण, पत्नी, मुलगी अशा अनेक नात्यांमधून कुटुंबाला आधार देणारी, घराला घरपण देणारी आणि कुटुंबासाठी अहोरात्र झटणारी असते. तिच्या कर्तृत्वाला आणि योगदानाला मानाचा मुजरा देण्यासाठी हा उपक्रम राबविला. यावेळी आजींना खाऊ भरवून त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत आनंदी सावंत, मंगला भावे, सुनीता बांदेकर, प्रमिला प्रभुदेसाई (सर्व रा. सबनीसवाडा, सावंतवाडी) तसेच राधाबाई होडावडेकर (रा. खासकीलवाडा, सावंतवाडी) यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी फिटनेस महिला अकॅडमीच्या जिल्हाध्यक्ष रसिका सावंत, जिल्हा उपाध्यक्ष चेतना शिंदे, कोषाध्यक्ष निशिगंधा सावंत, सहसचिव अनघा चव्हाण यांच्यासह फिटनेस योगचे योगशिक्षक शेखर बांदेकर, रामनाथ सावंत, नारायण सावंत, अरुण पवार, रवींद्र प्रभुदेसाई, काशिनाथ पेडणेकर, अनिल मेस्त्री, विशाल लातये, निशा गवळी, रुपाली पेडणेकर, अनिशा घाडी, प्रगती बामणे, समिता गावडे आणि तृप्ती मालवणकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com