लोटेतील कारखानदारांवर तातडीने कारवाई करा

लोटेतील कारखानदारांवर तातडीने कारवाई करा

Published on

लोटेतील कारखानदारांवर तातडीने कारवाई करा
हुसैन दलवाईः मुख्यमंत्र्यांसह पर्यारण मंत्र्यांना भेटणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः कोकणात प्रदुषण वाढवून पर्यावरण आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या लोटेतील कारखानदारांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांकडे करणार आहे, अशी माहिती माजी खासदार हुसैन दलवाई यांनी दिली.
शुक्रवारी (ता. ६) लोटे येथील डॉ. खान केमिकल्स या कंपनीत झालेल्या स्फोटात पाच कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेबाबत संबंधित कंपनीकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही, असे दलवाई यांनी सांगितले. त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, लोटे एमआयडीसी परिसरात केमिकल कंपन्यांमधील अपघात स्थानिकांसाठी नवीन नाहीत. २०२१ पासूनच्या घटनांकडे पाहिले तरी अनेक गंभीर अपघात घडले आहेत. घरडा केमिकल्समध्ये झालेल्या स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर याच परीसरातील चार विविध कंपन्यांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे डॉ. खान केमिकल्समधील स्फोट ही दुर्दैवी घटना असली तरी ती नवीन नाही.
या कंपनीमध्ये इथेनॉल या कच्च्या मालाचा वापर करून काही रसायने तयार केली जातात. या प्रक्रियेत निर्माण होणारा अल्कोहोल आधारित कचरा अत्यंत घातक असून तो तळोजा येथील इन्सिनरेटरमध्ये नष्ट करणे आवश्यक आहे. मात्र संबंधित कंपनी हा कचरा स्थानिक विक्रेत्यांमार्फत अनियमित पद्धतीने नष्ट करतात. लोटे एमआयडीसी परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याची गंभीर परिस्थिती असून फॅक्टरी इन्स्पेक्टरचे कार्यालय कोल्हापूर येथे असल्यामुळे अपघात झाल्यानंतर अधिकारी उशिरा घटनास्थळी पोहोचतात. गॅस गळतीसारख्या गंभीर घटनांनंतरही प्रशासन वेळेवर उपस्थित राहत नाहीत. सरकारी नियम न पाळणाऱ्या कारखानदारांना कायद्याच्या कक्षेत आणले पाहिजे, अशी मागणीही दलवाई यांनी केली आहे.

कोट
लोटे येथे सतत होणारे अपघात, प्रदुषण आणि वायु गळतीची चौकशी करण्यासाठी शासनाने स्वतंत्र समिती नेमावी. या समितीमध्ये कोणताही सरकारी अधिकारी असू नये. जे कारखानदार सरकारी नियम पाळणार नाहीत. त्या कंपन्या बंद करा.
- हुसैन दलवाई, माजी खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com