करजुवेत ९ लिटर गावठी दारू जप्त
करजुवेत एकाकडून
गावठी दारू जप्त
संगमेश्वर, ता. ८ : तालुक्यातील करजुवे लोहारवाडी येथे हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी ९ लिटर दारू जप्त केली असून संशयिताला ताब्यात घेतले. सचिन सुरेश कुडतडकर (वय २६, रा. करजुवे लोहारवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. ७) सायंकाळी ६:३० च्या सुमारास करजुवे लोहारवाडीत ही कारवाई केली. संशयिताच्या घरामागील जंगलमय भागात बेकायदेशीर दारूचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार संगमेश्वर पोलिस पथकाने छापा टाकला. या कारवाईत संशयित सचिन सुरेश कुडतडकर विनापरवाना हातभट्टीची दारू बाळगताना रंगेहाथ मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून ९५० रुपये किमतीची ९ लिटर दारू जप्त केली. कोणताही कायदेशीर परवाना नसताना दारूची साठवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. कॉन्स्टेबल सोमनाथ दत्ताराम खाडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला. संगमेश्वर पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

