

swt91.jpg
O29671
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा बँक कार्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेतर्फे
‘महिला दिन’ उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ ः महिला दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. हर्षदा देवधर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. बँकेच्या संचालिका प्रज्ञा ढवण, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, सरव्यवस्थापक दिवाकर सावंत, के. बी. वरक, शरद सावंत, बँक महिला कर्मचारी, अधिकारी व बँक सखी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रमोद गावडे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी बँक कामकाजाबाबत महिलांचा असलेला सहभाग उल्लेखनीय असल्याचे सांगितले. त्यांच्या हस्ते मान्यवरांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
उत्कृष्ट काम केलेल्या बँक सखींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रीती चव्हाण (शाखा फोंडाघाट), तन्वी तुळसुलकर (तुळसुली), शिवानी वेंगुर्लेकर (कामळेवीर), वैशाली बोवलेकर (मठ), दुर्वा गवळी (सावंतवाडी), समीक्षा वालावलकर (नेरुर) या सहा बँक सखींचा सन्मान करण्यात आला. डॉ. देवधर यांनी उपस्थितांना महिला दिनाविषयी मार्गदर्शन केले. बँकेचे सर व्यवस्थापक (प्रशासन) शरद सावंत यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.