

swt918.jpg
29714
मळेवाड ः शिबिराचे दीपप्रज्वलन करताना डॉ. स्वाती गायकवाड, डॉ. अदिती ठाकर, डॉ. विक्रम मस्के, सागर नाणोसकर, मदन मुरकर.
मळेवाड़ आरोग्य केंद्रामध्ये
महिलांची आरोग्य चिकित्सा
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. ९ ः अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, मळेवाड यांच्यावतीने आज विशेष ‘एएनसी आणि स्त्रीरोग आरोग्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आले. या शिबिरात गरोदर मातांसह इतर महिलांच्या विविध स्त्रीरोगांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या डॉ. स्वाती गायकवाड यांच्यासह मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. अदिती ठाकर, डॉ. विक्रम मस्के, युवासेना प्रमुख सागर नाणोसकर, मदन मुरकर उपस्थित होते. केंद्रीय आयुष मंत्रालयांतर्गत असलेल्या गोवा येथील संस्थानच्या ''स्त्रीरोग प्रसूतीतंत्र'' विभागाद्वारे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. श्री. नाणोसकर यांनी आयुर्वेद संस्थानच्या सेवेचा नागरिकांना लाभ मिळवून देण्याचा मानस व्यक्त केला. आशा स्वयंसेविकांसाठी विशेष व्याख्यानात गर्भधारणेदरम्यान योग्य आहार आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक काळजी यावर मार्गदर्शन करण्यात आले. लाभार्थी महिलांना मोफत आयुर्वेदिक औषध किटचे वाटप करण्यात आले. मळेवाड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यू. टी. राणे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.