सावंतवाडीत शिंदे सेनेच्या जाधव बिनविरोध

सावंतवाडीत शिंदे सेनेच्या जाधव बिनविरोध

Published on

29729

सावंतवाडीत शिंदे सेनेच्या जाधव बिनविरोध

पंचायत समिती सभापती; भाजपचे गौरव मुळीक उपसभापती

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः येथील पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीची प्रक्रिया आज येथील पंचायत समिती सभागृहात उत्साहात पार पडली. सभापतिपदी शिंदे शिवसेनेच्या सुस्मिता जाधव तर उपसभापतिपदी भाजपचे गौरव मुळीक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तब्बल चार वर्षांच्या प्रशासकीय काळानंतर ही निवड प्रक्रिया पार पडली असून, सावंतवाडी पंचायत समितीवर पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकला आहे.
​निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया झाली. सहायक गटविकास अधिकारी यशवंत गवस, कक्ष अधिकारी विनायक पिंगुळकर उपस्थित होते. या निवडीमध्ये भाजपचे ६, शिवसेनेचे ६, अपक्ष ५ आणि ठाकरे शिवसेनेचा १ असे बलाबल होते. सभापतिपद आरक्षित असल्याने महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील पंचायत समिती सदस्या सुस्मिता जाधव यांनी सभापतिपदासाठी, तर याच मतदारसंघातील भाजपचे सदस्य गौरव मुळीक यांनी उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल केला होता. दोन्ही पदांसाठी केवळ एक-एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी घोषित केले.
​या निवडीमुळे सावंतवाडी पंचायत समितीला २४ वे सभापती तर ९ व्या महिला सभापती मिळाल्या आहेत. नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, अवनी राऊळ, प्रणाली टिळवे, प्राजक्ता केळुसकर, मायकल डिसोजा, प्रशांत सुकी, सदाशिव राणे, महेश धुरी, धनश्री मराठे, शरद धाऊसकर, उदय पारिपत्ये, नेहा कांबळी, जितेंद्र गावकर, उत्कर्षा गावकर, ऋतिका नाईक, प्रियांका देसाई यांच्यासह सावंतवाडी प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, भाजप युवा नेते विशाल परब, भाजप नेते विनोद राऊळ, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, मायकल डिसोजा, नितीन राऊळ, अशोक दळवी, श्वेता कोरगावकर, ॲड. नीता सावंत-कविटकर, नारायण उर्फ बबन राणे, दिनेश गावडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com