कुडाळात शिंदे शिवसेनेचा सभापती

कुडाळात शिंदे शिवसेनेचा सभापती

Published on

swt९२३.jpg मध्ये फोटो आहे.
मिलिंद नाईक, सीताराम तेली

कुडाळात शिंदे शिवसेनेचा सभापती

मिलिंद नाईक बिनविरोध; उपसभापतिपदी भाजपचे तेली

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः येथील पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक तर उपसभापतिपदी भाजपचे सीताराम तेली यांची बिनविरोध निवड झाली. ठाकरे शिवसेनेने या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही पदांसाठी महायुतीतर्फे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला. त्यामुळे नाईक आणि तेली यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.
कुडाळ पंचायत समितीत महायुतीचे स्पष्ट वर्चस्व आहे. येथे भाजपचे सात, शिंदे शिवसेनेचे सहा आणि ठाकरे शिवसेनेचे पाच असे एकूण अठरा सदस्य आहेत. महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार सभापतिपदासाठी साळगाव पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक तर उपसभापतिपदासाठी झाराप पंचायत समिती सदस्य सीताराम तेली यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यानुसार दोघांनीही आज अधिकृतरित्या आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अमरसिंह जाधव यांच्याकडे दाखल केले. गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम उपस्थित होते. भाजपपेक्षा एक सदस्य कमी असूनही सभापतिपद शिंदे शिवसेनेला मिळवून देण्यात आमदार नीलेश राणे यांना यश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या निवडीमुळे कुडाळ तालुक्यात आमदार राणेंचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले. उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, शिवसेना जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य दादा साईल, भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, पप्या तवटे, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, रुपेश कानडे, नागेश आईर, दीपक नारकर, पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू, बाळकृष्ण मडव, निखिल कांदळगावकर, देवेंद्र नाईक, अरविंद करलकर, विनायक राणे, कान्हु शेळके, मोहन सावंत, राजा प्रभू, अरविंद परब यांच्यासह महायुतीचे सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. दुपारी तीननंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी, अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया झाली. दोन्ही पदांसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाली.
.......................
सभापती बनण्याचे स्वप्न अखेर पूर्ण
मिलिंद नाईक हे तुळसुली ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. यापूर्वी ते पंचायत समिती सदस्य होते. त्यांचे सभापती बनण्याचे स्वप्न होते, ते स्वप्न आज झालेल्या बिनविरोध निवडीत पूर्ण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com