

- rat९p२५.jpg-
२६O२९८०८
रत्नागिरी ः जिल्हापरीषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी निवेदन देताना आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी.
-----
अंगणवाडी सेविकेवरील हल्ल्याचा निषेध
आरोग्य सेवा कर्मचारी संघटना; संबधितावर कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : दापोली तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य सेविकेला झालेल्या मारहाणीतील संबंधित दोषीवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच मारहाणीची तीव्र निषेधही नोंदविण्यात आला.
आरोग्य कर्मचारी अहोरात्र समाजाच्या सेवेसाठी कार्यरत असतात. मात्र, अशा प्रकारे त्यांच्यावर होणारे हल्ले निंदनीय असून यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपीला तत्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनाही देण्यात आले. याबाबत संघटना जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर म्हणाले, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. जर या प्रकरणात पीडित सेविकेला लवकरात लवकर न्याय मिळाला नाही आणि दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी कामबंद आंदोलन करू. दरम्यान, दापोलीतील अंगणवाडीतील आरोग्य सेविकेला मारहाण झालेल्या प्रकरणात पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पुढे आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.