डाक अदालत १६ रोजी रत्नागिरीत
डाक अदालत
१६ रोजी रत्नागिरीत
रत्नागिरी ः अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरीद्वारा १६ मार्च रोजी दुपारी ३ वा. विभागीय स्तरावरील डाक अदालत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाशेजारी कार्यालयात आयोजित केली आहे. पोस्टाच्या कामासंबंधी ज्या तक्रारींचे निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक अदालतीत दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, डाकवस्तू, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डरबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रारअर्ज करावा, तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. डाकसेवेबाबतची आपली तक्रार अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी यांच्या नावे १२ मार्चपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल, अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही.
-------
एमआयडीसी येथे १३ ला
प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन
रत्नागिरी ः जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने १३ रोजी सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आवार, नाचणे रोड, पोस्ट एमआयडीसी येथे ''''प्लेसमेंट ड्राईव्ह" चे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील खासगी आस्थापनांनी महास्वयंम वेबपोर्टलच्या माध्यमातून प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होऊन बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहन प्र. सहाय्यक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांना किंवा उद्योजकांनी आपणांकडे उपलब्ध असलेली रिक्त पदे www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर अधिसूचित करावीत, अशा सूचना दिलेल्या आहेत. तसेच उमेदवारांनी या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास, कृपया कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.
-----
लांजा येथे
रविवारी महामेळावा
रत्नागिरी ः नवी दिल्लीतील राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, मुंबईतील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, लांजा तालुका वकील संघ यांच्यावतीने विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा १५ मार्च रोजी सकाळी १० वा. लांजा येथील श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय मैदानात आयोजित केला आहे. या महामेळाव्याचे उद्घाटन न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई, तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जे. जामदार यांच्या हस्ते होणार असून, न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती हितेन एस. वेणेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद वाय. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या वेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र आर. पाटील, लांजा तालुका वकील संघाचे अध्यक्ष सदानंद गांगण यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

