

swt105.jpg
29920
सावंतवाडी ः पतंजली योग समितीतर्फे महिला दिन साजरा करण्यात आला.
पतंजली योग समितीतर्फे
सावंतवाडीत महिला दिन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः येथील योगवर्गामध्ये पतंजली योग समिती, सावंतवाडी आणि महिला पतंजली समिती, सावंतवाडी यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ योगसाधक डॉ. रोहिणी बांदेकर, वर्षा बांदेकर, मनीषा वाडकर, राधिका मुंज, अंकिता चव्हाण, पूजा शिरसाट, संजीवनी शिरसाट, सुजाता शिरसाट, हर्षा जाधव, डॉ. समता धुरी, आशाताई पाटे, महिला पतंजली सावंतवाडी तहसील महामंत्री प्रज्ञा चौगुले, संघटनमंत्री तथा संपर्क प्रभारी मृणाली गवंडे, ज्येष्ठ योगसाधक संजय म्हापसेकर, आनंद म्हापसेकर, सुरेश चव्हाण, तुकाराम कुमठेकर, आनंद चव्हाण, संदीप पाटे, पतंजली योग समिती सावंतवाडी तहसील प्रभारी बाबली गवंडे आदी उपस्थित होते.
या निमित्त संगीतमय वातावरणात योगनृत्य व प्राणायाम करण्यात आला. तसेच तुलसी पुन:रोपणही करण्यात आले. योगवर्गात होमहवनासह समाज रक्षणासाठी योगसाधकांचे औक्षण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगवर्गाच्या सर्व योगसाधकांचे उत्तम सहकार्य लाभले.
.....................
swt106.jpg
29921
रत्नागिरी ः प्रा. सुमेधा सावळ यांना पुरस्कार देऊन गौरविताना मान्यवर.
प्रा. सुमेधा सावळ यांना
‘रणरागिणी’ पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १० ः ईगल फाउंडेशन रत्नागिरी यांच्यामार्फत महिला दिनाचे औचित्य साधून येथील डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सुमेधा सावळ यांना राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम कवी केशवसुत स्मारक, मालगुंड (रत्नागिरी) येथे नुकताच झाला. याप्रसंगी रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, उपविभागीय पोलिस अधिकारी राधिका फडके, केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, श्रीमती कीर, विलासराव कोळेकर, सागर पाटील, बाबासाहेब राशीनकर, प्रकाश वंजोळे आदी उपस्थित होते.
श्रीमती फडके यांच्या हस्ते सुमेधा सावळ यांना मानपत्र, सन्मानचिन्ह व कोल्हापूरी फेटा बांधून गौरविण्यात आले. क्रीडा शिक्षिका म्हणून केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचे संस्था, शाळा, विद्यार्थी व पालकांकडून अभिनंदन होत आहे. प्रा. प्रदीप देसाई यांनीही प्रा. सावळ यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.