समान संधीमुळे महिलांचे कर्तृत्व सिध्द

समान संधीमुळे महिलांचे कर्तृत्व सिध्द

Published on

swt108.jpg
29922
रानबांबुळी ः येथे उन्नती महिला मंडळातर्फे आयोजित महिला दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करताना मान्यवर.

समान संधीमुळे महिलांचे कर्तृत्व सिध्द
प्रभाकर सावंत ः रानबांबुळीत उन्नती मंडळातर्फे महिला दिन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ९ ः महिलांना समान संधी दिल्यास त्या प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करत समाजाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावतात. रानबांबुळी गावात महिलांना संधी मिळत असल्यामुळे त्या विविध क्षेत्रात पुढे येत आहेत, असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी रानबांबुळी येथील महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
उन्नती महिला मंडळ, रानबांबुळी यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (ता. ८) विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला न्यायाधीश रसिका निकुंभ, उपजिल्हाधिकारी आरती देसाई, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, पंचायत समिती सदस्य अमित भोगले, सरपंच परशुराम परब, सजय लाड, उपसरपंच अंजली कदम, मुक्ता भोगले, उन्नती महिला मंडळ अध्यक्षा लतिका परब, अशोक परब, बबन परब आदी उपस्थित होते.
गेली दहा वर्षे हा सोहळा गावात उत्साहात साजरा केला जातो. यात महिला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आहेत. रानबांबुळी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत २५ हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अनुक्रमे केसर वानवडेकर, विजया खांदारे, गार्गी सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला. क्रिकेट स्पर्धेत गोरोबा क्रिकेट संघ प्रथम विजेता, स्वप्नपूर्ती क्रिकेट संघ, रानबांबुळी उपविजेता ठरला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
उपजिल्हाधिकारी आरती देसाई, सुप्रिया वालावलकर, सरपंच परब यांनी मार्गदर्शन केले. दिया जाधव, गीतांजली जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उन्नती महिला मंडळाच्या सर्व महिला, बचतगटातील सर्व महिला व ग्रामस्थ यांनी विशेष प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com