चिरेखणीवरील महिला कामगारांची आरोग्य तपासणी

चिरेखणीवरील महिला कामगारांची आरोग्य तपासणी

Published on

- rat९p८.jpg-
P२६O२९७२५
रत्नागिरी ः कोतवडेत आरोग्य विभागाकडून महिलांची आरोग्य तपासणी करताना वैद्यकीय पथक.
-----
चिरेखाणीतील महिलांपर्यंत पोहोचली आरोग्य सेवा
कोतवडे आरोग्य केंद्राचा पुढाकार ; महिला दिनानिमित्त तपासणी, मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकाने थेट दुर्गम भागातील चिरेखाणी आणि आंबा बागेत जाऊन महिला कामगारांची आरोग्य तपासणी केली. प्रत्यक्ष कार्यस्थळी जाऊन राबवलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिरवणे येथील धनगरवाडी परिसरातील चिरेखाणीवर काम करणाऱ्या महिला, गुरखा महिला, तरुणी आणि बालकांची यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली. केवळ तपासणीच नव्हे, तर आवश्यक औषधांचे वाटपही करण्यात आले. महिला दिनानिमित्त या श्रमकरी महिलांना पुष्प, भेटवस्तू आणि पौष्टिक खाऊ देऊन सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुक्तेश्वरी पाखरे व डॉ. मंदार कुलकर्णी यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी लसीकरणाचे महत्त्व, गरोदर मातांचा पौष्टिक आहार आणि आरोग्यविषयक खबरदारी घेणे, विविध शासकीय योजना व उपायांची माहिती घेणे असे मुद्दे विचारात घेतले आहेत.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कोतवडे आरोग्य केंद्राच्या दिव्यांका केतकर, आदिती मांडवकर, लीना हातखंबकर, नेहा जाधव, सोनाली शेलार आणि सुरेखा झोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
----
आरोग्य सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न
दुर्गम भागात जिथे आरोग्य सेवा पोहोचणे कठीण असते, तिथे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी येऊन आरोग्य विभागाने घेतलेल्या या पुढाकारामुळे स्थानिक महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘जिल्हा आरोग्य विभाग, रत्नागिरी’च्या माध्यमातून दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा प्रभावी संदेश यातून देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com