उन्हाचा कडाका वाढला, शाळा सकाळी घ्या
30000
उन्हाचा कडाका वाढला, शाळा सकाळी घ्या
शिक्षक संघाचे साकडे ; जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. १० ः रत्नागिरी जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून अनेक भागांत पाणीटंचाईचे संकट आवासून उभे राहिलेले आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा १६ मार्चपुर्वीच सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात, अशी मागणी अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाने शिक्षण विभागाकडे केली आहे. यावर ५ मार्च रोजी निवेदन देऊनही जिल्हा परिषद प्रशासनाने अद्याप निर्णय न घेतल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परीषद प्रशासनाने यापूर्वी काढलेल्या पत्रानुसार, जिल्ह्यातील शाळा १६ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचे नियोजन आहे. मात्र, मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमानाचा पारा वाढल्याने दुपारच्या सत्रात शाळेत असणाऱ्या लहान विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. उन्हामुळे विद्यार्थ्यांना डिहायड्रेशन आणि इतर त्रासांचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षक संघाने १० मार्चपासूनच शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती. प्रशासकीय दिरंगाईवर नाराजी शिक्षक संघाने ५ मार्च रोजीच यासंदर्भात रीतसर निवेदन दिले होते. आज १० मार्च उजाडला तरीही प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत.
‘‘निवेदन देऊन पाच दिवस उलटले, तरी प्रशासन सुस्त का?’’ असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. वाढत्या उष्म्यामुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण असून, जिल्हा प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून तत्काळ आदेश काढावेत, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, जिल्हापरिषदेच्या अडीच हजार शाळा असून पटसंख्या सुमारे ६५ हजाराहून अधिक आहे. त्यातील पहीले ते पाचवीचे विद्यार्थी सर्वाधिक आहेत. काही शाळांमध्ये विज नसल्यामुळे पंखाही उपलब्ध नाही. त्या ठिकाणी वर्गात राहणेही शक्य होत नाही. या बाबींकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
----
कोट
"विद्यार्थ्यांचे हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता आणि पाणीटंचाई पाहता शाळा लवकर सकाळच्या सत्रात होणे गरजेचे होते. ५ मार्चला निवेदन देण्यात आले आहे
- दिलीप देवळेकर, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

