रांगोळी स्पर्धेत अवनी परवडे प्रथम

रांगोळी स्पर्धेत अवनी परवडे प्रथम
Published on

rat१०p१०.jpg-
२६O२९९७८
रत्नागिरी : परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात रांगोळी स्पर्धेत रांगोळी रेखाटताना इयत्ता चौथीचे विद्यार्थी.
----
रांगोळी स्पर्धेत अवनी परवडे प्रथम
अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात ,आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ४५ विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख रंगावली रेखाटल्या व त्यात रंग भरले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक अवनी परवडे, द्वितीय संस्कृती भातडे आणि तृतीय रुची सांडीम यांनी यश मिळवले. तसेच वेद गावडे, अवनी ठीक, शौर्य मोरे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम प्रतिवर्षी राबवला जातो. रांगोळी व विविध रंग वापरून आपल्या आवडीची रांगोळी विद्यार्थ्यांनी रेखाटली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे विषय निवडून आकर्षक रंगाच्या वापरातून सुरेख कलाकृती साकारल्या. रांगोळी प्रदर्शनाचे उद्‍घाटन दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा दाक्षायणी बोपर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. रांगोळी प्रदर्शन पाहून त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे भरभरून कौतुक केले. शाळेत चालू असलेल्या विविध उपक्रमांच्या यशस्वितेबद्दल समाधान व्यक्त केले. उद्घाटन झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पालकांनी मुलांच्या कल्पकतेबाबत उत्तम अभिप्राय नोंदवले. अशा अनेक उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ शाळेच्या माध्यमातून मिळत असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण फाटक हायस्कूलचे कलाशिक्षक नीलेश पावसकर आणि कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाचे शुभम वाडये यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक विनोद नारकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com