सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा आरोस येथे सन्मान

सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान 
महिलांचा आरोस येथे सन्मान
Published on

29996

सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान
महिलांचा आरोस येथे सन्मान

सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. १० ः आरोस दांडेली येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष माऊली महिला मंडळ शिरोडाच्या रेखाताई गायकवाड, डॉ. कालिंदी रानभरे, मानसिक आरोग्य तज्ज्ञ (कोल्हापूर) संपदा थोरात, गोकुळ दूध संघाच्या सदस्य म्हापण वृद्धाश्रमाच्या संचालिका सानिका तुळसकर, जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर, पंचायत समिती सदस्य धनश्री मराठे यांचा सन्मान करण्यात आला. माऊली महिला मंडळ शिरोडा पदाधिकारी श्रद्धा कदम, छाया शिवचरण, माया रहाटे, वंदना करंबेळकर, फेमिना फर्नांडिस मालवण, विद्या नवाधे, माजी विद्यार्थी सुचिता कारुडेकर, पूजा धुरी आदी उपस्थित होते. शाळेच्यावतीने कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून रंगत आणली. मुख्याध्यापक सतीश उकरंडे आदी उपस्थित होते. अर्चना लोखंडे यांनी प्रस्तावना केली. सरोज चव्हाण यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com