आचरा ‘होम मिनिस्टर’मध्ये मधुरा परब पैठणीच्या मानकरी
29999
आचरा ‘होम मिनिस्टर’मध्ये
मधुरा परब पैठणीच्या मानकरी
रामेश्वर वाचनालयाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १० ः श्री रामेश्वर वाचन मंदिर आचराच्या महिला दिनानिमित्त आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत मधुरा परब (आचरा देऊळवाडी) पैठणीच्या मानकरी ठरल्या. उपविजेत्या राधा राणे (आचरा देऊळवाडी) यांना सोन्याची नथ देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. ८) संस्थेच्या सभासद सौभाग्यवतींसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचा प्रारंभ जिल्हा परिषद सदस्य वर्षा सांबारी यांच्या हस्ते झाला. संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, त्रिंबक वाचनालयाचे सुरेंद्र सकपाळ, रामेश्वर वाचनालयाच्या उर्मिला सांबारी, वैशाली सांबारी, भिकाजी कदम, ग्रंथपाल विनिता कांबळी, वैशाली देसाई, अनिता आचरेकर, भावना मुणगेकर आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या सुरुवातीला आचरा काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
होम मिनिस्टर स्पर्धा ५ फेऱ्यांमध्ये घेण्यात आली. उपस्थित प्रेक्षकांसाठी प्रश्नमंजूषा घेण्यात आली. तसेच प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्या १० विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू दिल्या. सर्व सहभागी ३२ स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविले. जिल्हा परिषद सदस्या सांबारी यांनी स्पर्धकांना अल्पोपहार दिला. स्पर्धा यशस्वीतेसाठी वाचन मंदिरचे महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री, स्वप्नील चव्हाण, सांस्कृतिक समिती सदस्या भावना मुणगेकर, कामिनी ढेकणे, श्रद्धा महाजनी यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

