गणपत गावकर यांचे निधन
30028
गणपत गावकर यांचे निधन
ओटवणे, ता. १० ः संभाजी ब्रिगेडचे मुंबई विभागाचे सचिव तथा ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष गणपत शंकर गावकर (वय ६६) यांचे सोमवारी (ता. ९) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. गिरणी कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी लढा देताना मुंबई टेक्स्टाईल कामगारांसाठी सदनिका मिळवून दिल्या. राष्ट्रीय मिल मजूर संघाचे ते चिटणीस होते. मुंबईत सहकाऱ्यांना सोबत घेत सुशील सहकारी पतसंस्था स्थापन करून तेथील टॅक्सी, रिक्षा, फेरीवाले यांना कर्ज देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. ताशंगा प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष होते. सुरुवातीला काँग्रेस पक्षात वांद्रे पूर्व विभाग ब्लॉक अध्यक्ष तसेच जिल्हा सचिव पदावर काम केले. मुंबईच्या मराठा सेवा संघातही कार्यरत होते. शिवसंग्राम संघटनेतही विविध पदे भुषवली. ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे ते कार्याध्यक्ष होते. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, बहिणी, भावजय, भावोजी असा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

