‘आडाळी’ विषमुक्त शेतीच्या दिशेने
30027
‘आडाळी’ विषमुक्त शेतीच्या दिशेने
ग्रामपंचायतीचा संकल्प; कार्यशाळेत सेंद्रीय शेतीचे धडे
सकाळ वृत्तसेवा
कळणे, ता. ४ : ग्रुप ग्रामपंचायत आडाळी-फोंडीयेने विषमुक्त सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘एक पाऊल विषमुक्त शेतीच्या दिशेने, आरोग्यदायी समृद्ध जीवनाकडे’ हा उपक्रम सुरू केला आहे. याचाच भाग म्हणून नुकत्याच आयोजित कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी रासायनिक शेतीचे दुष्परिणाम, सेंद्रिय शेतीचे फायदे व विषमुक्त शेतीमधील उत्पादन वाढीसाठीचे तंत्र यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ही कार्यशाळा प्रत्यक्ष नीळकंठ गावकर यांच्या बागेत पार पडली. देवगड येथील कृषी अधिकारी बापूसाहेब लांबाडे व ‘आत्मा’चे निकेतन राणे यांनी रासायनिक शेतीमुळे जमिनीचा पोत व मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. तसेच जीवामृत आणि नैसर्गिक कीटकनाशक निर्मितीचे प्रात्यक्षिकही दाखविले.
दरम्यान, प्रगतशील शेतकरी व गांडूळखत उत्पादक अनंत नाडकर्णी यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच गावकर, ग्रामपंचायत अधिकारी नम्रता सावंत, कृषी पर्यवेक्षक प्रियांका गोवेकर, उपसरपंच विशाखा गावकर, सदस्य अमोल परब, संजना गावकर, निशा गावकर, लक्ष्मण मेस्त्री आदी उपस्थित होते.
----
अभियानाचा मुख्य उद्देश असा..
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सरपंच पराग गावकर यांच्या संकल्पनेतून ‘एक पाऊल विषमुक्त शेतीच्या दिशेने, आरोग्यदायी समृद्ध जीवनाकडे’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत रोजच्या आहारातील भाजी व अन्य कडधान्ये सेंद्रिय खते आणि कीटकनाशके वापरून पिकवण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करणे, असा मुख्य उद्देश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

