सावंतवाडी येथे रविवारी रंगभरण, चित्रकला स्पर्धा

सावंतवाडी येथे रविवारी
रंगभरण, चित्रकला स्पर्धा
Published on

सावंतवाडी येथे रविवारी
रंगभरण, चित्रकला स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान व सावंतवाडी पालिकेच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमाने (कै.) प्रा. मिलिंद भोसले स्मृतीप्रीत्यर्थ ‘आपण व्यक्त होऊया’ समितीकडून तालुकास्तरीय रंगभरण चित्रकला स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. पहिली ते दुसरीसाठी रंगभरण तर तिसरी व चौथीसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.
रविवारी (ता.१५) दुपारी साडेतीनपासून येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान‌‌‌मध्ये स्पर्धकांच्या नावनोंदणीला सुरुवात होणार आहे. चित्रकला स्पर्धेसाठी ‘माझे कुटुंब, माझी शाळा’, ‘माझ सुंदर गाव/माझं सुंदर शहर’ हे विषय ठेवण्यात आले आहेत. दोन्ही गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक, उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना आकर्षक बक्षिसे तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या ठिकाणी दुपारी ३.३० वाजता उपस्थित राहून नावनोंदणी आवश्यक आहे. प्रवेश विनामूल्य आहे. चित्र काढण्यासाठी दोन तासांचा अवधी दिला जाणार आहे.‌ कोणत्याही एका विषयावर चित्र काढणे बंधनकारक आहे. रंगभरण व चित्र काढण्यासाठी कागद आयोजकांकडून दिला जाणार आहे. पेन्सिल, पॅड, रबर, कलर आदी साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहे. बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी त्याच ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून (कै.) किशोर दत्ताजीराव भोसले स्मृती आरोग्य व सामाजिक सेवा पुरस्कार‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सावंतवाडी’ यांना प्रदान करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. रंगभरण व चित्रकला स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com