

30241
‘चार्मिंग लेडी’ स्पर्धेमध्ये विचारे विजेत्या
कणकवलीतील स्पर्धा; भाग्यश्री, सुप्रिया यांना उद्योगिनी पुरस्कार
कणकवली, ता.११ : जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर कणकवलीत मिळून साऱ्याजणी मंचाच्यावतीने महिला दिनाचा कार्यक्रम झाला. यातील चार्मिंग लेडी स्पर्धेत शिवानी राज विचारे या विजेत्या ठरल्या. पाककला स्पर्धेत प्राजक्ता विक्रांत गाड यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर भाग्यश्री आणि सुप्रिया पवार यांना उद्योगिनी पुरस्काराने गौरविण्यात आले. मातोश्री मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम झाला.
नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी आमदार वैभव नाईक यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्यासह नगरसेवक जयेश धुमाळे, रूपेश नार्वेकर, नगरसेविका जाई मुरकर, सुमेधा अंधारी, मिळून साऱ्याजंणी मंचाच्या अध्यक्ष मधुरा पालव आदी उपस्थित होते.
आनंद सावंत यांनी ‘योग संजीवनी’ विषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर पाककला स्पर्धा झाली. यात प्राजक्ता विक्रांत गाड (मसाला तिसऱ्या) यांनी प्रथम क्रमांक, गंधाली गुरुनाथ शिरोडकर (शेवग्याच्या पाल्याचे लाडू) यांनी द्वितीय तर आरती पाचंगे (चिकन मॅट समोसा) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. उत्तेजनार्थ पारिताेषिक राधिका मुसळे, उत्कर्षा उत्तम धुमाळे यांना देण्यात आला.
सौंदर्य आणि बुद्धीमत्ता यांचा मिलाफ असलेल्या चार्मिंग लेडी स्पर्धेचे विजेतेपद शिवानी राज विचारे यांनी पटकावले. तर तन्वी भट उर्फ सुहासिनी कुलकर्णी उपविजेत्या ठरल्या. उत्कृष्ट पोशाखसाठी भाग्यश्री आचरेकर, विशेष बुद्धिमान पारितोषिक शितल शिरसाट यांना, बेस्ट कॅटवॉकसाठी रसिका साटम लाड, उत्कृष्ट हेअर स्टाईल शितल माळी, उत्कृष्ट आत्मविश्वास साठी पुनम बागवे यांना पारितोषिक देण्यात आले. तर उत्कृष्ट सहभाग म्हणून प्राची पारकर आणि नेहा आनंद मर्ये यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण अनुप्रिया नीलेश खाडिये यांनी केले.
कार्यक्रमात उद्योगिनी पुरस्काराने नवजीवन फांऊडेशनच्या भाग्यश्री दत्तात्रय पवार आणि सुप्रिया दत्तात्रय पवार यांना गौरविण्यात आले. कर्तृत्ववान महिला म्हणून डॉ. सौ रुचिरा सावंत, उर्फ वर्षा करंबेळकर, निर्वाणा जिमच्या तनुश्री मानकर, आणि राज्य शासनाचे विविध पुरस्कार विजेत्या अनुप्रिया खाडिये यांना गौरविले. राज्य महिला आयोगाचा यावर्षीचा पुरस्कार मिळविलेल्या अभिनेत्या अक्षता कांबळी यांचा विशेष पुरस्काराने गौरव झाला. मिळून साऱ्याजणी परिवारातील महिलांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समृद्धी पारकर, प्रियांका कोदे, नेहा मरये, पुनम म्हापसेकर, मनीषा शिरसाट, दिव्या साळगावकर, प्रीती म्हापसेकर आदींनी मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.