

फोटो : kan112.jpg
कणकवली : येथील पदर प्रतिष्ठानच्या महिला दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करताना नगरसेविका सुप्रिया नलावडे, अध्यक्षा मेघा गांगण, हर्षदा गवाणकर.
पाककला स्पर्धेत मानसी मेस्त्री प्रथम
कणकवलीत स्पर्धा; पदर प्रतिष्ठानच्या उपक्रमांना प्रतिसाद
कणकवली, ता. ११ : येथील पदर प्रतिष्ठानतर्फे लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालयात सलग दोन दिवस महिला दिनाचा कार्यक्रम झाला. यात शहरातील महिलांनी विविध कलागुणांचे कार्यक्रम सादर केले. यातील पाककला स्पर्धेत मानसी मेस्त्री यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
प्रज्ञा ढवण, पदर महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण, उपाध्यक्षा हर्षदा गवाणकर, नगरसेविका सुप्रिया नलावडे, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, आर्या राणे, व्यसनमुक्ती समितीच्या जिल्हाध्यक्षा अर्पिता मुंबरकर, विद्या घाणेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
पाककला स्पर्धेत पल्लवी मुणगेकर द्वितीय, नेहा शंकरदास यांनी तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिक कविता अबुलकर, मंजिरी वारे आणि कामिनी कसालकर यांना दिले. महिलांच्या आरोग्याबाबत व्याख्याने झाली. यात मानसशास्त्रीय समुपदेशक कावेरी कासरलकर यांनी ‘मनाचे ओझे कमी करण्यासाठी एक सुरक्षित संवाद’विषयी मार्गदर्शन केले. कुष्ठरोग निर्मूलन अधिकारी प्रशांत बुचडे यांनी कुष्ठरोग प्रतिबंध व त्याविषयी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती दिली. दीपिका पावसकर यांनी, महिलांनी स्त्रीत्व जपत जीवनात आलेल्या अनुभवांमधून उद्योग क्षेत्रात कशी प्रगती साधता येते, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच मासिक पाळीदरम्यान घ्यावयाच्या आरोग्यविषयक काळजीबाबत माहिती दिली. वसुधा माने यांनी ‘ओंकार प्रधान’ या गाण्याने सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात केली. व्यसनमुक्ती समितीच्या जिल्हाध्यक्षा अर्पिता मुंबरकर यांनी व्यसनमुक्तीची शपथ दिली. विविध नृत्य व कलाप्रकारांचे सादरीकरण झाले. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत गार्गी कामत हिने प्रथम, दिशा अंधारी हिने द्वितीय, तर कविता अबुलकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. पूजा माणगावकर आणि सोनाली परब यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. अक्षता खांबाळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘फॅशन शो’ सादर केला. तालुक्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार झाला. यामध्ये प्रख्यात डॉक्टर व महिला क्रिकेटपटू प्राजक्ता नाचणे-तेली, मालवणी भाषा बोलत लोकांच्या मनामनांपर्यंत पोहोचत लोकप्रिय झालेल्या निशाताई केळुसकर, अंकुरम प्ले स्कूलच्या माध्यमातून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या गायत्री देवळी, तसेच लेखिका-कवयित्री रुपाली कदम यांचा सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.