खेळ म्हणजे केवळ क्रीडाप्रकार नव्हे, तर आयुष्यच
- rat११p३.jpg-
26O30174
डेरवण ः जलतरणपटू मनोज एरंडे मनोगत व्यक्त करताना.
----
खेळातून घडते उत्तम व्यक्तिमत्त्व
मनोज एरंडे ः डेरवण यूथ गेम्सचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ : ‘खेळ हा केवळ एक क्रीडाप्रकार नसून ते संपूर्ण आयुष्य आहे. एक उत्तम माणूस म्हणून घडण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण खेळ आपल्याला शिकवतो. आजच्या मोबाईलच्या युगात जर तुम्ही मैदानावर उतरून एखादा खेळ खेळत असाल तर त्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही,’ असे उद्गार शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध जलतरणपटू मनोज एरंडे यांनी काढले.
विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टच्या क्रीडासंकुलात आयोजित १२व्या ‘डेरवण यूथ गेम्स २०२६’चा समारोप सोहळा नुकताच पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून एरंडे बोलत होते. शिवजयंतीनिमित्त आठवडाभर चाललेल्या या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाच्या सांगता समारंभाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे माजी क्रीडा संचालक डॉ. दीपक माने, एसव्हीजेसीटीचे विश्वस्त विकास वालावलकर, डॉ. सुवर्णा पाटील, शरयू यशवंतराव, श्रीकांत पराडकर, अजित गाळवणकर, संदीप तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी एरंडे म्हणाले, ‘स्वप्न, समर्पण, निश्चय आणि निष्ठा या चतुःसूत्रीचा अवलंब केल्यास तुम्ही आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हाल.’
एसव्हीजेसीटीच्या उपक्रमाचे कौतुक करताना डॉ. दीपक माने म्हणाले, येत्या १० वर्षांत भारत हे जगातील सर्वात मोठे क्रीडा केंद्र म्हणून उदयाला येईल. देशात खेळाडूंसाठी अनेक व्यासपीठे निर्माण होत आहेत. क्रीडाक्षेत्राकडे आता एक करिअर आणि व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे, ही स्वागतार्ह बाब आहे.
या प्रसंगी क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांनी महोत्सवाचा आढावा सादर केला. यावर्षी १९ विविध क्रीडाप्रकारांमध्ये ६,८०० खेळाडूंनी सहभाग घेतला. विजेत्यांना ११५ चषक, १,१६० पदके आणि १६ लाख रुपयांहून अधिक रकमेची पारितोषिके देण्यात आली. आठ हजारांहून अधिक क्रीडारसिकांनी या महोत्सवाला हजेरी लावली. यंदा प्रथमच समाविष्ट करण्यात आलेल्या स्केटिंगमध्ये ९० स्पर्धकांनी भाग घेतला, तर खो-खोमध्ये ७२ आणि कबड्डीमध्ये ६९ संघ उतरले होते.
---
शर्वरी, राजवीर ठरले वेगवान धावपटू
समारोपप्रसंगी १०० मीटर धावण्याच्या अंतिम फेऱ्या पार पडल्या. यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. १०० मीटर धावण्याचा निकाल असा ः मुली - शर्वरी निकम (कोल्हापूर), ध्रुविका पवार (छत्रपती संभाजीनगर), अना (ठाणे), कनन देसाई (ठाणे). मुले : राजवीर कचरे (सातारा), स्नेह कामेरकर (ठाणे), सक्षम चव्हाण (ठाणे), मानस शिंदे (ठाणे).
---
मल्लखांबमध्ये साताऱ्याचे वर्चस्व
मल्लखांब स्पर्धेत साताऱ्याच्या खेळाडूंनी आपले दबदबा निर्माण केला. यामध्ये साताऱ्याच्या महाराजा सयाजीराव विद्यालयाच्या आयुष काळगे याला ‘उत्कृष्ट मल्लखांबपटू’ तर वैष्णवी पवार हिला ‘उत्कृष्ट मल्लखांबपटू’ म्हणून गौरवण्यात आले. साताऱ्याच्या आठ संघांनी पारितोषिके पटकावली. त्या खालोखाल पुणे पाच, सांगली चार, रत्नागिरी तीन, मुंबई तीन, सोलापूर, पालघर, नाशिक आणि रायगड येथील प्रत्येकी एका संघाने यश संपादन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

