कोकणातील प्रक्रिया उद्योगात महिलांना मोठी संधी

कोकणातील प्रक्रिया उद्योगात महिलांना मोठी संधी

Published on

कोकणातील प्रक्रिया उद्योगात महिलांना संधी
रिया विचारे ः शृंगारतळी येथे शेतकरी महिलांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ११ : ‘वाढत्या पर्यटनामुळे कोकणातील उत्पादनांना मोठी मागणी आहे. कोकम सरबत, आमरस, करवंद लोणचेसारख्या शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगात महिलांना अनेक संधी आहेत. याचा लाभ घेऊन गुहागरमध्ये महिला उद्योजिकांची नवी पिढी घडावी,’ असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक रिया विचारे यांनी केले.
शृंगारतळी येथील पाटपन्हाळे ग्रामपंचायत येथे जागतिक महिलादिन व आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी दिनानिमित्त विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. गुहागर ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, ‘टेक्नो सर्व्ह’, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
कृषीक्षेत्रात आणि कंपनीच्या कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाच महिला शेतकऱ्यांचा या वेळी ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनीच्यावतीने गौरव करण्यात आला. यामध्ये धनश्री मांजरेकर, नीता दाबके, नम्रता भेकरे, गौरी खरे आणि संजना खेतले यांचा समावेश होता. या मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी महिलांना मार्गदर्शन केले त्यात तालुका कृषी अधिकारी क्षीरसागर यांनी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. मंदार जोशी यांनी सकस आहार आणि आर्थिक बचतीसाठी परसबागेचे महत्त्व विशद केले. आर्थिक सल्लागार गजानन जोशी यांनी महिलांना गुंतवणूक आणि बचतीचे योग्य मार्ग सांगितले. तर सत्कारमूर्ती नीता दाबके यांनी जयपूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मसाला पीक परिषदेतील आपले अनुभव इतर महिलांशी शेअर केले. राकेश ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. या मेळाव्याला शृंगारतळी पंचक्रोशीतील बचतगटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com