भाट्ये येथे अन्न प्रक्रिया व मत्स्य संपदा योजनांचे मार्गदर्शन

भाट्ये येथे अन्न प्रक्रिया व मत्स्य संपदा योजनांचे मार्गदर्शन

Published on

- rat११p४.jpg-
२६O३०१३१
रत्नागिरी ः भाट्ये येथे अन्नप्रक्रिया व मत्स्यसंपदा योजनांवर मार्गदर्शन कार्यशाळेला उपस्थित शेतकरी.
-----
अन्नप्रक्रिया-मत्स्य योजनांवर जनजागृती
भाट्ये येथे शिबिर; अनुदान, कर्ज प्रक्रियेवर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग आणि प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना यासाठी बँक ऑफ इंडिया ही नोडल बँक म्हणून कार्यरत आहे. या अनुषंगाने भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात मंगळवारी (ता. १०) विशेष जनजागृती शिबिर झाले.
बँक ऑफ इंडियाचे आंचलिक प्रबंधक नरेंद्र देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बँक ऑफ इंडिया रत्नागिरी अंचल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, वरिष्ठ प्रबंधक (कृषी विभाग) संकेत सकपाळ, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी लतिका गावडे, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कृषिविद्यावेत्ता डॉ. किरण मालशे आदी उपस्थित होते. स्टार कृषी विकास केंद्राचे वरिष्ठ प्रबंधक दिनकर कुटे यांनी शिबिराचा उद्देश आणि प्रास्ताविक मांडले.
या शिबिरात दोन्ही योजनांतर्गत मिळणारे अनुदान, बँकेच्या कर्ज सुविधा आणि अर्ज प्रक्रिया यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील ‘पीएमएफएमई’ आणि ‘केसीसी फिशरीज’ अंतर्गत प्रलंबित प्रकरणांमधील अडचणींचा आढावा घेण्यात आला. कृषी अधिकारी, बँक जिल्हा समन्वयक, बँक अधिकारी आणि लाभार्थी यांच्या समन्वयातून या अडचणींचे जागेवरच निराकरण करण्यात आले. या शिबिराचे फलित म्हणून ‘पीएमएफएमई’ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. संकेत लेंडे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com