डॉ. राधिका जोशींच्या गायनाने रंगणार

डॉ. राधिका जोशींच्या गायनाने रंगणार

Published on

डॉ. राधिका जोशी यांच्या गायनाने
रंगणार ‘खल्वायन’ची संगीत सभा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : रत्नागिरीतील प्रसिद्ध ‘खल्वायन’ संस्थेची ३२३ वी मासिक संगीत सभा शनिवारी, १४ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. ‘कै. अण्णाप्पा जोशी स्मृती संगीत मैफल’ म्हणून साजरी होणाऱ्या या सभेत पुण्याच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ. राधिका जोशी यांचे गायन होणार आहे.
ही मैफल एसटी स्टँडसमोरील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत रंगणार आहे. यामध्ये डॉ. राधिका जोशी शास्त्रीय संगीतासह अभंग आणि नाट्यसंगीतही सादर करणार आहेत. डॉ. राधिका जोशी या जयपूर-अत्रौली घराण्याच्या उदयोन्मुख आणि प्रतिभावान गायिका आहेत. त्यांनी प्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांच्याकडे २० वर्षांहून अधिक काळ तालीम घेतली आहे. तसेच पद्मविभूषण गिरिजा देवी यांच्याकडून त्यांनी उपशास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत. राधिका यांना नुकताच प्रतिष्ठित ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर युवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. या मैफलीत त्यांना दापोलीचे सोहम जोशी (तबला) आणि चिपळूणचे अमित ओक (हार्मोनियम) हे नामवंत वादक साथसंगत करणार आहेत. या मैफलीचा रसिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com