निवती ग्रामपंचायतीत पशुसंवर्धनाचे धडे
swt116.jpg
30169
मेढा निवती ः दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन करताना यज्ञा साळगावकर. बाजूला अवधुत रेगे, विष्णू फणसेकर, पशुवैद्यकीय अधिकारी व अन्य.
निवती ग्रामपंचायतीत पशुसंवर्धनाचे धडे
प्रशिक्षण शिबिराला प्रतिसाद ः लसीकरण, शासन योजनांबाबत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ११ ः जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि पंचायत समिती वेंगुर्ले, तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी कार्यालय वेंगुर्ले यांच्यावतीने ॲस्कड अंतर्गत माहिती, शिक्षण व जनसंपर्क अभियान अंतर्गत एकदिवसीय पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण शिबिर आज मेढा निवती ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडले. या शिबिराला शेतकरी तसेच पंचक्रोशीतील शेतकरी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्या यज्ञा साळगावकर, उद्घाटक वेंगुर्ले पंचायत समिती नवनिर्वाचित उपसभापती सचिन देसाई, मेढा निवती सरपंच अवधुत रेगे, पंचायत समिती सदस्य विष्णू उर्फ आप्पा फणसेकर, डॉ. समीर बिलोलकर (जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय सिंधुदुर्ग), वासुदेव नाईक (गटविकास अधिकारी, वेंगुर्ले), सागर चव्हाण (पशुवैद्यकीय अधिकारी, होडावडा), डॉ. आकाश कलाल (पशुवैद्यकीय अधिकारी वेतोरे), डॉ. प्रियांका टिकोरे (पशुवैद्यकीय अधिकारी शिरोडा), विजय म्हापणकर (पशुधन विकास अधिकारी वेंगुर्ले), डॉ. विद्यानंद देसाई (तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी वेंगुर्ले), डॉ. उमेश पेंडूरकर (सहाय्यक पशुधन विकास अधिकारी कोचरे), जे. बी. जानकर (सहायक, पशू विभाग अधिकारी), डी. एस. वेंगुर्लेकर, कविता परब, पत्रकार संदिप चव्हाण तसेच उपसरपंच प्रज्योत मेतर, ग्रामविकास अधिकारी शरद शिंदे, तृप्ती कांबळी, प्राजक्ता निवतकर, गुरुष्का कोचरेकर, अमिषा आमडोस्कर, नमिता घाटवळ, शीतल पाटकर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये पशुधनाचे व्यवस्थापन, वैरण विकास योजना ,जंतनाशक व गोचीड प्रतिबंधक उपाययोजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पशुधनातील विविध साथीचे रोग, नियंत्रणात्मक उपचार व रोगप्रतिबंधक लसीकरण याविषयी माहिती देण्यात आली. कृत्रिम रेतन, गाई-म्हशीतील वंध्यत्वाची कारणे व वंध्यत्व निवारण उपाययोजना लंपी चर्मरोगाची लक्षणे व उपाय, लसीकरणाचे महत्त्व आणि फायदे सांगण्यात आले . पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात आली. हे शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मेढा निवती ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

