घारपी शाळेत रंगपंचमीनिमित्त विद्यार्थ्यांकडून  रंगांची उधळण

घारपी शाळेत रंगपंचमीनिमित्त विद्यार्थ्यांकडून रंगांची उधळण

Published on

swt118.jpg
30171
घारपी ः शाळेत रंगपंचमी साजरी करताना विद्यार्थी, शिक्षक व पालक.

घारपी शाळेत विद्यार्थ्यांकडून रंगांची उधळण
बांदा ः घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा केला. रंगपंचमीच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात आनंद, उत्साह आणि रंगांची उधळण पाहायला मिळाली. यावेळी विद्यार्थ्यांनी एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. रंगांच्या माध्यमातून मैत्री, बंधुभाव आणि आनंदाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी सणाचा मनमुराद आनंद घेतला. शाळेच्या परिसरात ''रंगपंचमीच्या शुभेच्छा'' अशा घोषणांनी वातावरण आनंदमय झाले. कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रंगपंचमीचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगितले. सण साजरा करताना पर्यावरणपूरक रंगांचा वापर करावा आणि सण सुरक्षितपणे व आनंदाने साजरा करावा, असा संदेशही विद्यार्थ्यांना देण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील, सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर, उपाध्यक्षा यशोदा गावडे, अंगणवाडी सेविका संजना गावकर, मदतनीस अमृता कविटकर, संचिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
........................
swt119.jpg
30172
फणसगाव ः महिला दिनानिमित्त उपडाकघरात महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

फणसगाव उपडाकघरात महिलांचा गौरव
तळेरे ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देवगड तालुक्यातील फणसगाव उपडाकघर येथे महिला कर्मचारी व महिला ग्राहकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला सब पोस्ट मास्टर राजू तडवी, मुटाट शाखा डाकपाल पूर्वा बापट, पाटगाव शाखा डाकपाल प्रणाली घोणे, पोंभुर्ले शाखा डाकपाल विशाखा बाईत, सफाई कर्मचारी सौ. नाईक, जीडीएस पॅकर सूरज ठुकरूल, राजाराम शिंदे, अंगद धगे यांच्यासह कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पूर्वा बापट यांनी, प्रत्येक स्त्रीचा आदर आणि सन्मान हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता, तो वर्षाचे ३६५ दिवस घर आणि कामाच्या ठिकाणी राखला गेला पाहिजे, असे मत व्यक्त केले. सूरज ठुकरूल यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com