

30167
सावंतवाडीत दुचाकी रॅलीतून
महिला सुरक्षिततेचे प्रबोधन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः स्त्रीजन्माचे स्वागत आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश जनमानसांत रुजवण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत अभय केंद्र, सावंतवाडी यांच्यावतीने सोमवारी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेचा भाग म्हणून शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली. ही रॅली येथील पोलिस ठाण्यापासून नगरपरिषद कार्यालयापर्यंत काढली. रॅलीच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमास सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती दीपाली भालेकर, तालुका संरक्षण अधिकारी पुरुषोत्तम पाटील, सावंतवाडी ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक माधुरी मुळीक, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या श्रीमती घाडीगावकर व श्रीमती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीमध्ये पोलिस ठाण्याच्या महिला कर्मचारी, तालुक्यातील अंगणवाडी सेविका, तसेच जिल्हा महिला व बालविकास सिंधुदुर्ग विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीचा समारोप नगरपरिषद येथे झाला. उपस्थितांनी स्त्री भ्रूणहत्या रोखणे आणि मुलींना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी समाजात व्यापक परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.