५७४ शेतकऱ्यांना मिळाले २ कोटी ८९ लाख
जिल्ह्यात हमीभाव भातखरेदीला गती
मार्केटिंग फेडरेशनकडून खरेदी; ५७४ शेतकऱ्यांना मिळाले २ कोटी ८९ लाख
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी ‘द मार्केटिंग फेडरेशन’च्यावतीने सुरू असलेल्या भातखरेदी प्रक्रियेने वेग घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५७४ शेतकऱ्यांनी १३ हजार ६५४ क्विंटल भाताची विक्री केली असून, ३१ मार्चपर्यंतच ही मुदत असल्याने शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात दरवर्षी शासनाच्यावतीने हमीभावाने भात खरेदी केली जाते. यावर्षी भातविक्रीसाठी एकूण १ हजार ८५५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन विकण्यापूर्वी ‘स्लॉट बुकिंग’ करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांनी भातविक्री केल्यानंतर त्याची रक्कम थेट त्यांच्या बँकखात्यावर जमा करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी भाताला प्रतिक्विंटल २ हजार ३०० रुपये दर देण्यात आला होता. यावर्षी त्यात ६९ रुपयांची वाढ करून २ हजार ३६९ रुपये हमीभाव निश्चित करण्यात आला आहे; मात्र, दुसरीकडे खुल्या बाजारात तांदळाचे दर ४२ पासून १२० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. खुल्या बाजारातील चढ्या दरांच्या तुलनेत हमीभाव कमी असल्याची भावना शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.
----
नऊ केंद्रांवर खरेदी प्रक्रिया
साधारणपणे जिल्ह्यात १३ ते १४ केंद्रांवर भात खरेदी केली जाते; परंतु यावर्षी केवळ नऊ केंद्रांवरच ही प्रक्रिया सुरू आहे. या केंद्रांवर आतापर्यंत ५७४ शेतकऱ्यांनी १३ हजार ६५४.८० क्विंटल भाताची विक्री केली आहे. या उत्पादनाचे एकूण मूल्य ३ कोटी २३ लाख ४८ हजार २२१ रुपये इतके असून, त्यापैकी १०६ शेतकऱ्यांच्या खात्यावर २ कोटी ८९ लाख १ हजार ८०० रुपये जमा करण्यात आले आहेत.
---
उत्पादकतेत घट
यंदा भाताची उत्पादकता कमी असल्याने विक्रीसाठी येणाऱ्या भाताचे प्रमाणही काहीसे मर्यादित आहे. तरीही, ३१ मार्च ही अंतिम मुदत असल्याने उर्वरित नोंदणीकृत शेतकरी आपली विक्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी घाई करत आहेत.
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

