कोकणातील परंपरा
कोकणातील परंपरा----------लोगो
(नवीन आहे)
चला करूया वृक्षसंवर्धनाचा संकल्प!
होळी हा आपला आनंदाचा आणि परंपरेचा सण आहे; मात्र, या उत्सवासाठी होणारी वृक्षतोड सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. आज होळीसाठी झाडे शोधायला दूरवर जावे लागत आहे, हे संकेत ओळखायला हवेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. केवळ झाडे तोडण्यापेक्षा ती लावण्यावरही भर दिला पाहिजे.
26O30204
- डॉ. दिलीप नागवेकर, रत्नागिरी.
---
सध्या शिमगोत्सवाची धूम कोकणात सुरू आहे. मुंबईकर चाकरमानीही गावागावात ठाण मांडून आहेत. होळी तोडण्यापासूनची परंपरा गावोगावी प्रथेनुसार जपल्याचे पाहायला मिळाले. गावोगावच्या पालख्या परंपरेनुसार एकमेकांच्या भेटी घेत आहेत. काही वर्षांपूर्वी शिमगोत्सवाबाबत सर्वेक्षण केले होते. तालुक्यातील गावांत साधारण २ ते १२ वाड्या असतात. काही गावे १२ वाड्यांची आहेत तर काही गावांत १२ पेक्षा जास्त वाड्या आहेत. गोळपमध्ये २६ वाड्या आहेत. प्रत्येक वाडीवर फाकपंचमीला शेवर अगर आंब्याची फांदी उभी करून होम केला गेला. फाकपंचमी ते पौर्णिमा या कालावधीत दररोज होम केला जातो. यासाठी सरासरी १ ते २ होळ्या वापरल्या जातात. काही ठिकाणी दररोज एक याप्रमाणे १० दिवस १० होळ्यांचा होम करण्याची प्रथा आहे. होमासाठी दररोज १० दिवस गवत, झाडांच्या फांद्या, नारळ-सुपारी झावळा, काडीकचरा, लाकडाचे ओंडके, गोवऱ्या यांचा वापर होतो.
काही गावात आलटून-पालटून आंबा अगर सूरमाडाची होळी उभी केली जाते. शिरगावमध्ये ७ ते ८ बांबूंची होळी उभी करण्याची प्रथा आहे. आंब्याच्या झाडाची उंची सरासरी ५० ते ६० फूट तर बुंध्याकडील गोलाई २ ते ३ फूट असते. होळी मोडण्याची अनोखी प्रथा कुरतडे आणि तोणदे आदी काही गावांत आहे. प्रत्येकी आंब्याच्या दोन होळ्या आणल्या जातात. त्यातील एक होळी उभी केली जाते तर एका होळीचे झाड नाचवत नाचवत मोडून टाकले जाते. उभी केलेली होळी पाडव्याच्या दिवशी तोडली जाते व त्याचा देवांचा नैवेद्य करण्यासाठी काही दिवस वापर केला जातो.
शेवर या झाडांच्या ४५० ते ५०० होळ्या तर १४० ते १५० आंब्याच्या आणि सुपारी व इतर १५ ते २० झाडांच्या फांद्यांचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे रत्नागिरी तालुक्यात आंब्याची ७० ते ७५ झाडे, सूरमाडाची ४५ ते ५० झाडे तर सुपारीची २ ते ५ झाडे होळीसाठी दरवर्षी वापरली जातात. काही गावांत आलटून-पालटून आंबा अगर सूरमाडाची होळी उभी केली जाते. शिरगावमध्ये ७ ते ८ बांबूंची होळी उभी करण्याची प्रथा आहे. आंब्याच्या झाडाची उंची सरासरी ५० ते ६० फूट तर बुंध्याकडील गोलाई २ ते ३ फूट असते. होळी मोडण्याची अनोखी प्रथा कुरतडे आणि तोणदे आदी काही गावांत आहे. प्रत्येकी आंब्याच्या दोन होळ्या आणल्या जातात. त्यातील एक होळी उभी केली जाते तर एका होळीचे झाड नाचवतात. उभी केलेली होळी पाडव्याच्या दिवशी तोडली जाते व त्याचा देवांचा नैवेद्य करण्यासाठी काही दिवस वापर केला जातो. शेवर या झाडांच्या ४५० ते ५०० होळ्या तर १४० ते १५० आंब्याच्या आणि सुपारी व इतर १५ ते २० झाडांच्या फांद्यांचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे रत्नागिरी तालुक्यात आंब्याची ७० ते ७५ झाडे, सूरमाडाची ४५ ते ५० झाडे तर सुपारीची २ ते ५ झाडे होळीसाठी दरवर्षी वापरली जातात.
होळी हा आपला पारंपरिक सण असून, तो आपण आनंदाने आणि उत्साहाने देवाच्या नावाखाली साजरा करतो; परंतु देवाने निर्माण केलेल्या सृष्टीचा आपण ऱ्हास करतोय, हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे कोकणातील एका रत्नागिरी तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात होळीसाठी वृक्षतोड होत आहे, हे लक्षात घेतले तर संपूर्ण कोकणात काय घडत असेल याचा अंदाज येतो. हे जरी सत्य असले तरी दरवर्षी आपण याच पद्धतीने होळी साजरी करणार यात शंका नाही; परंतु त्यासाठी या झाडांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. येत्या जून महिन्यात आपण सर्वांनी मिळून आंब्याच्या बाटा लावून झाडांची संख्या वाढवूया. सध्या होळीसाठी झाडं शोधावी लागत आहेत. दूरवर अंतरावर ती सापडत आहेत; परंतु भविष्यात दूरवर ती सापडतील काय, याचा विचार करण्याची गरज आहे आणि म्हणूनच येत्या पावसाच्या सुरुवातीला आंब्याच्या बाटी लावून दुसरा होळीचा सण साजरा करूया.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

