रत्नागिरीत गुढीपाडव्याला नववर्ष स्वागतयात्रा

रत्नागिरीत गुढीपाडव्याला नववर्ष स्वागतयात्रा

Published on

rat11p11.jpg-
30212
रत्नागिरी : रत्नागिरीत सकल हिंदू समाजातर्फे गुढीपाडव्याला निघणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेच्या बैठकीला उपस्थित हिंदू समाजातील प्रतिनिधी.
------------
रत्नागिरीत गुढीपाडव्याला नववर्ष स्वागतयात्रा
नियोजनासाठी बैठक ; पारंपरिक वेशभूषा, दुचाकी फेरीही काढणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेच्या नियोजनासाठी पतितपावन मंदिरात बैठक झाली. या बैठकीला सकल हिंदू समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते. या यात्रेचे यंदा २२वे वर्ष असून, यंदा रथ आणि हजारो हिंदू बंधू-भगिनी पारंपरिक वेशभूषेत जल्लोष करणार आहेत. स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला शहरातून दुचाकी फेरीसुद्धा काढण्यात येणार आहे. या स्वागतयात्रेला श्री देव भैरी मंदिर देवस्थान ट्रस्ट व पतितपावन संस्थेच्यावतीने सर्व हिंदूंना आवाहन केले आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ आहे. त्या निमित्ताने १९ मार्चला रत्नागिरी शहरात दरवर्षीप्रमाणे नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात काढण्याचे नियोजन करण्यात आले. स्वागतयात्रा ‘ग्राममंदिर ते समाजमंदिर’ या संकल्पनेवर आधारित असून, शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. यात्रेची सुरवात सकाळी ९ वाजता श्री देव भैरी मंदिरातून होईल. भैरी मंदिरात गुढी उभी करून गावाचे गाऱ्हाणे घातल्यानंतर ९.३० वाजता स्वागतयात्रा सुरू होणार आहे. त्यानंतर श्री देव भैरी मंदिर -जयस्तंभ–श्री मारूती मंदिर-जयस्तंभ-श्री पतितपावन मंदिर असा यात्रेचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. साधारण ९च्या सुमारास मारूती मंदिर सर्कल येथूनही स्वागतयात्रा सुरू होऊन ती माळनाका, जयस्तंभ येथे येईल व दोन्ही यात्रा एकत्र होतील. यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून केले आहे.
या नियोजन बैठकीत यात्रेच्या मार्गाचे नियोजन, सहभागी संस्थांचा समन्वय तसेच कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक व्यवस्था यावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. बैठकीला श्री देव भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र सुर्वे आणि श्री पतितपावन संस्थेचे अध्यक्ष उन्मेष शिंदे, सुधाकर सावंत, विठ्ठल मंदिर संस्थेचे अध्यक्ष आनंद मराठे, संयोजक राजेश आयरे, राजू जोशी, माजी अध्यक्ष बाबासाहेब परूळेकर उपस्थित होते.

कोट
डोंबिवलीमध्ये गुढीपाडवा स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर रत्नागिरीतही भैरी देवस्थानचे दिवंगत अध्यक्ष अरूअप्पा जोशी यांच्या नेतृत्वाखाली बैठक होऊन स्वागतयात्रेला सुरवात झाली. यंदा २२वे वर्षे आहे. रत्नागिरीपाठोपाठ जिल्ह्यात ७ ठिकाणी अशी मोठ्या जल्लोषात स्वागतयात्रा काढली जात आहे. चित्ररथ, हजारो अधिक हिंदू बंधू-भगिनी या यात्रेत सहभागी होतात. दरवर्षी सहभागींच्या संख्येत वाढ होत आहे.
- रवींद्र सुर्वे, अध्यक्ष, भैरी देवस्थान ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com