धाऊलवल्ली जेटीवर ''धूम'' स्टाईल वाहनांचा धूमाकूळ

धाऊलवल्ली जेटीवर ''धूम'' स्टाईल वाहनांचा धूमाकूळ

Published on

30263

धाऊलवल्ली जेटीवर ‘धूम’ स्टाईल वाहनांचा धुमाकूळ
नागरिक, पर्यटक त्रस्त ; अपघाताची भीती, प्रशासनाचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ः तालुक्यातील धाऊलवल्ली येथील प्रवासी जेटीवर बर्फ, पाणी व मच्छी वाहतूक करणार्‍या वाहनांमुळे परिसरातील नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. मच्छीवाहतूक करणारे टेम्पो वेगाने चालवले जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. काही वाहनांवर अप्रशिक्षित चालक असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या परिसरामध्ये असलेली अस्वच्छता आणि त्यातून वाढलेल्या दुर्गंधीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
धाऊलवल्ली येथील ही जेटी प्रवासी वाहतुकीसाठी असून, यापूर्वी बंदर विभागाकडून येथे मत्स्यव्यवसायाच्या होड्या किंवा बोटी लावू नयेत, असा फलक जेटीला लावण्यात आलेला होता; मात्र, तो फलकच सध्या गायब आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून या जेटीवर मोठ्या प्रमाणावर मासेमारी नौका उभ्या केल्या जात आहेत. त्यामधून जेटीवर मोठ्या प्रमाणावर मासळी उतरवली जाते. मोठमोठे वजनकाटे उभे करून खरेदी व्यवहार केले जात आहेत. तसेच नौकांमध्ये पाणी भरणे व बर्फ चढवणे, अशी कामे केली जातात. या परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून, स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
जेटीवरील समस्यांबाबत धाऊलवल्ली ग्रामपंचायतीमार्फत संबंधित व्यावसायिक संघटना, मत्स्य व्यवसाय अधिकारी व पोलिस प्रशासन यांना निवेदने दिली गेली. मात्र, त्या निवेदनाकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले गेले. मासळी वाहतुकीमुळे जेटी परिसरात कोंडी होते. अनेकदा वादावादीचे प्रसंगही घडतात. काही व्यावसायिक प्रामाणिकपणे व्यवसाय करत असले तरी काहीजण अत्यंत उर्मटपणे वागतात. या जेटीवरून जैतापूर खाडी व जुवे बेट येथे जाण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात; मात्र, परिसरातील अस्वच्छतेमुळे आता पर्यटकांची संख्याही कमी झालेली आहे. जेटीवरून नाटेकडे जाणारा तीव्र चढ-उताराचा रस्ता असून, या मार्गावरून मच्छीवाहतूक करणारे टेम्पो वेगाने धावत असल्याने अपघाताची भीती आहे. काही वाहनांवर अप्रशिक्षित चालक असतात. याची तत्काळ दखल घेऊन कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


कोट
धाऊलवल्ली जेटीवरून नाटेकडे जाणारा तीव्र चढ-उताराचा रस्ता असून, या मार्गाने मच्छीवाहतूक करणारे ट्रक भरधाव वेगाने चालवले जातात. त्यामुळे अपघाताचा प्रसंग निर्माण होतो. या परिसरातील अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरलेली आहे. नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागते, हे लक्षात घेऊन यावर तत्काळ उपाययोजना वा कार्यवाही होणे गरजेचे आहे.
- संकेत शिंदे, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com