सहकार पदविकेस अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
सहकार पदविकेस अर्ज
करण्यासाठी मुदतवाढ
रत्नागिरी ः शासकीय सहकार व लेखा पदविका (जीडीसी अँड ए) व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सीएचएम) परीक्षा २६, २७ व २८ मे रोजी होणार आहे. परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ९ जानेवारी ते १० मार्चपर्यंत होती. याबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थाच्या सहकार आयुक्त व निबंधक यांच्या सूचनेनुसार आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मुदत १५ मार्च रात्री ८ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यासाठी http://gdcs.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ जाहीर केले आहे. तसेच बँकेत चलनाने भरणा करण्याची मुदत १८ मार्च आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतवाढीचा लाभ घ्यावा व आपले अर्ज दाखल करताना रत्नागिरी या केंद्राची नोंद घेऊन अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन केंद्रप्रमुख तथा सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी केले आहे.
-------
महिला लोकशाही दिन
१६ मार्च रोजी
रत्नागिरी ः मार्च २०२६चा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन १६ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वा. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती यांनी सांगितले. जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. या वेळी अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात व त्यानुसार जिल्हास्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नांच्या कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात.
-------
जिल्हा परिषद वार्षिक
स्नेहसंमेलन उद्यापासून
रत्नागिरी ः जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचे ३०वे वार्षिक स्नेहसंमेलन १३ व १४ मार्च रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषद भवन, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आले आहे. या स्नेहसंमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे. शुक्रवारी (ता. १३) सकाळी १० वा. फनीगेम्स आणि १०.३० वा. पाककला उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १२.३० वा. स्नेहसंमेलन उद्धाटन, स्मरणिका प्रकाशन व विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि महसूल, ग्रामविकास व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार आहे.
--------
गोपाळवाडीत
उद्या शिबिर
रत्नागिरी ः खेड तालुक्यातील श्री राधाकृष्ण मंदिर सुकिवली (गोपाळवाडी) येथे १४ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी वैशाली पाटील यांनी केले आहे. महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणेव जनतेच्या तक्रारी त्वरित निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर अशा शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

