महावितरणची ८३ लाख ६७ हजार थकबाकी
लांजा तालुक्यात महावितरणची ८३ लाख ६७ हजार थकबाकी
लांजा, ता. ११ ः तालुक्यात वीजबिलांच्या थकबाकीचा आकडा ८३ लाख ६७ हजार रुपयांवर पोहोचला आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. तालुक्यात एकूण ३७ हजार ७७८ वीजग्राहक असून, विविध प्रकारच्या ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचे समोर आले आहे.
तालुक्यात लांजा १, लांजा २, भांबेड आणि साटवली अशी एकूण चार शाखा कार्यालये आहेत. घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक व शासकीय ग्राहकांची मिळून ३९ लाख ४ हजार रुपये, पाणीपुरवठा ग्राहकांची ३६ लाख ८२ हजार रुपये आणि पथदिव्यांची ७ लाख ८१ हजार रुपये अशी एकूण ८३ लाख ६७ हजार रुपयांची थकबाकी आहे. घरगुती ३३ हजार १८३ ग्राहकांपैकी ३ हजार ८३६ ग्राहकांकडे २२ लाख ४७ हजार रुपये, औद्योगिक ३७८ ग्राहकांपैकी ५२ ग्राहकांकडे ६ लाख ३३ हजार रुपये तर व्यावसायिक १ हजार ८४७ ग्राहकांपैकी २५३ ग्राहकांकडे ४ लाख ७२ हजार रुपये इतकी थकबाकी आहे. याशिवाय शासकीय ४५३ ग्राहकांपैकी १४४ ग्राहकांकडे ५ लाख ५२ हजार रुपये थकीत आहेत. तसेच पाणीपुरवठा विभागाच्या २९५ पैकी ११७ ग्राहकांकडे तब्बल ३६ लाख ८२ हजार रुपये तर पथदिव्यांच्या ११४ पैकी ३९ ग्राहकांकडे ७ लाख ८१ हजार रुपये इतकी थकबाकी असल्याचे समोर आले आहे.
थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून विशेष मोहीम राबवण्यात येत असून, लांजा शाखा कार्यालय २ आणि साटवली येथे वसुलीला चांगला प्रतिसाद मिळत आहे; मात्र लांजा शाखा कार्यालय क्र. १ आणि भांबेड येथे वसुलीचा प्रतिसाद तुलनेने कमी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, वीजबिल भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सुमारे ६० टक्के बिलांचा भरणा ऑनलाईन होत असल्याचे समजले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

