तळवडे जनता विद्यालयात किशोरी मेळावा उत्साहात
30242
तळवडे जनता विद्यालयात
किशोरी मेळावा उत्साहात
सावंतवाडी, ता. ११ : तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय (सिंधुदुर्ग) अंतर्गत अभय केंद्र, सावंतवाडी यांच्या वतीने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानांतर्गत ‘किशोरी मेळावा’ झाला.
व्यासपीठावर सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, विधी सेवा प्राधिकरणाच्या ॲड. पूजा जाधव, तालुका संरक्षण अधिकारी पुरुषोत्तम पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, सहाय्यक संरक्षण अधिकारी श्वेता बगळे आणि समुपदेशन केंद्राच्या समुपदेशक तृप्ती धुरी उपस्थित होते. यावेळी ॲड. पूजा जाधव यांनी विद्यार्थ्यांना ‘पोक्सो’ कायद्याची सविस्तर माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक मुळीक यांनी सायबर गुन्हे आणि सुरक्षित इंटरनेट वापराबाबत मार्गदर्शन केले. मेळाव्यादरम्यान महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांच्या माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांनी, सूत्रसंचालन शिक्षक प्रसाद आडेलकर यांनी केले. श्वेता बगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

