चिपळूण शहराच्या पूरसंरक्षण प्रकल्पाला मान्यता द्या

चिपळूण शहराच्या पूरसंरक्षण प्रकल्पाला मान्यता द्या

Published on

चिपळूणला पूरसंरक्षण प्रकल्प द्या
आमदार निकम : भरपाईसाठी भरीव तरतूद करा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः पूरनियंत्रणासाठी राज्यसरकारने सांगली-कोल्हापूरला शेकडो कोटी निधीची तरतूद केली. त्याप्रमाणे चिपळूण शहरासाठीही पूरसंरक्षण प्रकल्पाला मान्यता देण्यात यावी. दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे शहरातील व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यासाठी तातडीने भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी आमदार शेखर निकम यांनी विधीमंडळात केली.
अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना आमदार निकम म्हणाले, सरकारने कोकणच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय घ्यावेत. शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत बोलताना कोकणातील शेतीची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन फळबाग कर्जाचा समावेश करावा. कोकणातील शेती प्रामुख्याने हापूस आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि कोकमसारख्या फळबागांवर आधारित असल्याने त्या पिकांसाठी घेतलेल्या कर्जालाही कर्जमाफीचा लाभ मिळावा. दोन लाखांहून अधिक कर्ज घेतलेल्या आंबा-काजू बागायतदारांना अधिक अनुदान द्यावे. कोकणातील हवामान बदलामुळे आंबा-काजू पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने फळबागांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची गरज आहे. याबाबत राज्याचे फलोत्पादन मंत्री यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
-----------
चौकट
लोटे एमआयडीसीत सुरक्षेबाबत उपाययोजना करा
औद्योगिक क्षेत्रातील समस्यांकडे लक्ष वेधताना लोटे औद्योगिक परिसरात रासायनिक उद्योगांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची चौकशी करून स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी निकम यांनी केली. तसेच कामगारांसाठी आधुनिक आरोग्य सेवासुविधा व हॉस्पिटल उभारण्याची आवश्यकता त्यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com