

मालवणात सोमवारी
पेन्शन अदालत सभा
मालवण, ता. ११ : मालवण गटस्तरावर तिमाही पेन्शन अदालत सभा सोमवारी (ता. १६) सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेस संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी केले आहे.
टीपः swt1116.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - गुरू तेग बहादूर सिंग
मालवणात शनिवारी
‘शहादत’ कार्यक्रम
मालवण : श्री गुरू तेग बहादूर सिंग यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्याच्या उद्देशाने युथ फॉर भारत मालवणतर्फे शनिवारी (ता. १४) सायंकाळी ४. ३० वाजता दैवज्ञ भवन येथे ‘शहादत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वीरपुरुष, महापुरुष आणि अनामिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यामधील एक ज्वलंत नाव म्हणजे शिखांचे नववे गुरू तेग बहादूर सिंग हे होत. मानवतेच्या कल्याणासाठी त्यांनी २४ नोव्हेंबर १६७५ ला बलिदान दिले. या बलिदानाने क्रांतीची ज्योत धगधगली. या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण होत असून, या बलिदानाचे स्मरण व्हावे, म्हणून भारत सरकारने हे वर्ष ‘शहादत वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. सर्व मालवणवासीय मंगळवारी (ता. १४) या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमात धामणी, संगमेश्वर येथील व्याख्याते व प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.