काजू बागायतीत जाताना विशेष खबरदारी घ्यावी

काजू बागायतीत जाताना 
विशेष खबरदारी घ्यावी
Published on

30269

काजू बागायतीत जाताना
विशेष खबरदारी घ्यावी

काणेकरांचे शेतकऱ्यांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ११ : बांदा निशाण परिसरात गेल्या काही दिवसांत मृत माकडे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकरी व नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन बांदा ग्रामपंचायतीचे सदस्य तथा ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी केले आहे.
सध्या काजू हंगाम सुरू असल्यामुळे अनेक शेतकरी काजू बागायतीमध्ये नियमितपणे जात असतात. अशा परिस्थितीत बागायतीत जाताना विशेष काळजी घ्यावी. परिसरात मृत माकड दिसल्यास त्याच्या जवळ जाणे टाळावे. तसेच प्रशासनाला तत्काळ माहिती द्यावी, असेही काणेकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. अचानक ताप येणे, अंगदुखी, अशक्तपणा किंवा इतर कोणतीही शारीरिक अथवा प्रकृतीविषयक समस्या जाणवल्यास विलंब न करता तत्काळ नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. माकडांच्या मृत्यूच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण होऊ नये; मात्र, आवश्यक खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे काणेकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी ग्रामस्थांना सतर्क राहून आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com