लांज्यात शिवजयंतीनिमित्त रंगभरण स्पर्धा

लांज्यात शिवजयंतीनिमित्त रंगभरण स्पर्धा

Published on

लांज्यात शिवजयंतीनिमित्त रंगभरण स्पर्धा
लांजा ः लांजा इंग्लिश स्कूल आणि मॅक्स मोबाईल पॉईंट, बजाज फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेली शिवजयंतीनिमित्त रंगभरण स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला. या स्पर्धा पहिली ते बारावी विद्यार्थ्यांमध्ये घेण्यात आली. कार्यक्रमाला सुप्रसिद्ध चित्रकार, रांगोळीकार किरण बेर्डे, प्राचार्य अमोल जाधव, हरेश पटेल, नरेश पटेल आदी उपस्थित होते. या स्पर्धेत नववी ते बारावी गटात समृद्धी विक्रांत डोळस, तैजीब अब्दुल करीम बोबडे, सानवी जितेंद्र भालेकर यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले, तर उत्तेजनार्थ बक्षीस ओंकार विलास पाष्टे याला मिळाले. पाचवी ते आठवी गटात आयान सिराज नेवरेकर, आरोही शरद परब, ईश्वरी प्रसाद माने यांनी अनुक्रमे आणि अधिराज अभिजित राजेशिर्केला उत्तेजनार्थ, पहिली ते चौथी गटात रुद्र विजय चव्हाण, जानवी सुनील कामेरीकर, श्रेया प्रशांत करळकर यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. उत्तेजनार्थ पारितोषिक युगा महेश पोवार हिला देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com