नाचणीपासून विविध पदार्थ तयार करा

नाचणीपासून विविध पदार्थ तयार करा

Published on

नाचणीपासून पदार्थ तयार करा ः डॉ. वरवडेकर
दापोली ः नाचणी ही पौष्टिक व आरोग्यास अत्यंत उपयुक्त धान्य असून त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. मात्र नाचणीचा काळसर रंग पाहून लहान मुले नाचणीची भाकरी खाण्यास टाळाटाळ करतात. अशा परिस्थितीत नाचणीपासून मुलांना आवडणारे विविध पदार्थ तयार करून त्याचा रोजच्या आहारात सहज समावेश करता येऊ शकतो, असे प्रतिपादन विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. संतोष वरवडेकर यांनी केले. कृषी महाविद्यालयाने दत्तक घेतलेल्या किन्हळ गावात कृषी विस्तार विभागामार्फत ‘नाचणीयुक्त प्रक्रिया पदार्थांचे प्रशिक्षण’ कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला विस्तार शिक्षण विभागाचे वरिष्ठ संशोधन साहाय्यक डॉ. मंदार पुरी, कनिष्ठ संशोधन साहाय्यक शिल्पा नाईक, किन्हळ गावच्या महिला अध्यक्ष प्राजक्ता मोहिते आदी उपस्थित होते. डॉ. मंदार पुरी यांनीही नाचणीचे पोषणमूल्य आणि दैनंदिन आहारात तिचा वापर केल्यास होणारे आरोग्यदायी फायदे याबाबत माहिती दिली. प्रशिक्षणाचा एकूण १५ महिलांनी लाभ घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com