ःमुर्तवडे रस्ता दुरुस्तीला अखेर मुहूर्त

ःमुर्तवडे रस्ता दुरुस्तीला अखेर मुहूर्त

Published on

- ratchl११४.jpg-
P२६O३०२९०
चिपळूण ः सावर्डे-मुर्तवडे रस्त्यावरील खड्डे भरण्याचे सुरु झालेले काम.
-----
मुर्तवडेतील रस्ता दुरुस्तीला अखेर मुहूर्त
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः तालुक्यातील सावर्डे, आबिटगाव, मुर्तवडे, तवसाळ रस्ता दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला. मात्र, प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नव्हती. अखेर वहाळ गटाच्या जिल्हा परिषद सदस्या शिवानी सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर या मार्गावरील खड्डे भरण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.
तालुक्यातील वहाळ परिसरातील रस्ते मोठ्या प्रमाणात खड्डे पडून खराब झाले आहेत. खड्ड्यामुळे या भागात सातत्याने अपघात होत असल्याने खड्डे भरण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे सावर्डे, आबिटगाव, मूर्तवडे, तवसाळ रस्ता, वहाळ, वारेली, तोंडली, पिलवली रस्ता, वीर-देवपाट रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी ठेकेदारांना काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. वाहनचालकांची सातत्याने खड्ड्यातून वाहतूक सुरू असतानाही या मार्गावरील खड्डे भरले जात नव्हते. त्यामुळे वहाळ जिल्हा परिषद गटाच्या सदस्या शिवानी सावंत यांनी बांधकाम विभागाकडे याबाबतची विचारणा करत तातडीने काम सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार मुर्तवडे मार्गावर खड्डे भरण्यास सुरुवात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com