चिपळुणात आयएमएतर्फे कष्टकरी महिलांचा गौरव

चिपळुणात आयएमएतर्फे कष्टकरी महिलांचा गौरव

Published on

आयएमएतर्फे कष्टकरी महिलांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सावरकर सभागृहात इंडियन मेडिकल असोसिएशन आणि वुमन्स डॉक्टर विंगच्या चिपळूण शाखेतर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. अंजली शारंगपाणी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. ॲड. वृषाली सावंत यांनी महिलांची सुरक्षा आणि सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन केले. स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. समीना दलवाई यांनी मासिक पाळीतील तक्रारी, बदल, लक्षणे व उपचार, तसेच मेनोपॉजच्या काळात होणाऱ्या शारीरिक-मानसिक बदलांबाबत माहिती दिली. यानिमित्ताने फ्रीडायविंग या अनोख्या जलक्रीडेत आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवणारी समृद्धी देवळेकर हिचा विशेष सन्मान केला. समृद्धी सध्या एका श्वासावर तब्बल १२० फूटांहून अधिक खोल डाइव्ह करू शकते आणि चार मिनिटांहून अधिक वेळ श्वास रोखून ठेवू शकते. याचबरोबर कालुस्ते खुर्द येथील समरीन जमालुद्दीन कादरी हिचाही सन्मान केला. श्रम साफल्य महिला स्वयंसहायता संघाच्या सचिव पल्लवी रहाटे आणि चिपळूण पंचायत समितीच्या हॉटेल कँटीन चालक सारिका मेढेकर या कष्टकरी महिलांचाही सन्मान केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com