कणकवलीतील कचऱ्यावर प्रक्रियाच नाही
kan122.jpg
30366
कणकवली : येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह नगरसेवकांनी भेट देऊन पाहणी केली.
कणकवलीतील कचऱ्यावर प्रक्रियाच नाही
नगराध्यक्षांकडून नाराजी : तत्काळ कार्यवाही करण्याचे प्रशासनाला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १२ : कणकवली शहरातील प्रत्येक घराघरातून ओला, सुका आणि घातक कचऱ्याचे वेगवेगळे संकलन केले जाते. हा कचरा डेपोमध्ये गेल्यानंतर मात्र त्याचे एकत्रीकरण करून जाळून टाकला जात असल्याची बाब नगराध्यक्षांच्या पाहणी दौऱ्यात स्पष्ट झाली. शहरात संकलीत होणाऱ्या कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया सुरू करा, असे निर्देश नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिले.
नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्यासह अन्य सत्ताधारी नगरसेवक आणि नगरपंचायत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शहरातील गारबेज डेपोला भेट दिली. या पाहणी दौऱ्यात शहरातून संकलीत होणाऱ्या कचऱ्यावर कुठलीच प्रक्रिया होत नसल्याची बाब समोर आली. घराघरातून आणलेला ओला, सुका आणि घातक कचरा डेपोमध्ये साठवून ठेवला आहे. हा कचरा नंतर जाळून टाकला जातो.
नगरपंचायतीने ओल्या कचऱ्यापासून कंपोष्ट खत तर सुक्या कचऱ्याचे विलगीकरून त्यापासून विविध उत्पादने तयार करण्यासाठी लाखो रूपये तयार करून प्रक्रिया यंत्रे आणली आहेत. नगराध्यक्षांच्या पाहणी वेळी खत निर्मिती करणाऱ्या एकूण तीन मशिन पैकी दोन मशिन बंद असल्याची बाब समोर आली. तर एक मशिन सुरू असली तरी त्या मशिनचा वापर केला जात नाही. याखेरीज सुका कचरा विलगीकरण यंत्रणाही धूळ खात आहे.
नगरपंचायतीकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. प्रत्यक्षात या कचऱ्यावर प्रक्रियाय होत नसल्याने गारबेज डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याबद्दल नगराध्यक्ष पारकर यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी श्री. पारकर म्हणाले की, गारबेज डेपोमधील सर्व यंत्रणा चालू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. याखेरीज कचरा डेपोची काही जागा कचरा प्रक्रियेसाठी एजी डॉटर्सकडे या संस्थेकडे देण्यात आली होती. ही संस्था बंद पडल्याने नगरपंचायतीची गहाण जमीन पुन्हा ताब्यात घेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबतचा निर्णय १८ मार्च रोजी होणाऱ्या नगरपंचायतीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत घेतला जाणार आहे. दरम्यान कणकवलीतील कचरा प्रकल्पावर प्रत्येक महिन्याला १४ ते १५ लाख रूपये खर्च होतात. पण कचऱ्यावर कसलीच प्रक्रिया होत नाही हे दुदैव आहे.
श्री. पारकर यांच्या या पाहणी दाैऱ्यावेळी नगरसेवक जयेश धुमाळे, संकेत नाईक, लुकेश कांबळे यांच्यासह अॅड. सुदीप कांबळे, कौशिक पारकर, सोहम वाळके, नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक ध्वजा उचले, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सोनाली खैरे, बांधकाम अभियंता विभव करंदीकर, शहर समन्वयक जयश्री ठाकरे, मुकादम प्रकाश राठोड, कमलेश भंडारी, विशाल होडावडेकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

