विद्यार्थ्यांच्या व्यवहार कौशल्याची चुणूक

विद्यार्थ्यांच्या व्यवहार कौशल्याची चुणूक

Published on

swt129.jpg
30402
कासार्डे ः तांबळवाडी शाळेत निपुण माता पालक मेळाव्या उत्साहात झाला.

विद्यार्थ्यांच्या व्यवहार कौशल्याची चुणूक
कासार्डेतील ‘गावठी बाजार’ ः तांबळवाडी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १२ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासार्डे तांबळवाडी येथे जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यदिन निमित्त निपुण माता पालक मेळावा तसेच शालेय गावठी बाजार हा अभिनव उपक्रम उत्साहात झाला. या कार्यक्रमाला माता-पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात उल्लेखनीय काम केलेल्या मातांचा गौरव करण्यात आला.
प्रारंभी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ तसेच सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपशिक्षिका निकिता ठाकूर यांनी उपस्थित माता-पालकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत मार्गदर्शन केले. विशेष कामगिरी करणाऱ्या निपुण मातांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यानिमित्ताने शाळेत पहिल्यांदाच शालेय गावठी बाजार हा उपक्रम राबविण्यात आला. या बाजाराचे उद्घाटन शिक्षणप्रेमी सत्यवान आयरे, दीपक सावंत, शरद शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. आयरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत या उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा कासार्डे गावचे उपसरपंच गणेश देवजी पाताडे, आवळेश्वर गावच्या पोलिसपाटील स्वाती पाताडे, विलास पवार, उदित पवार, संतोष चव्हाण, राजेंद्र मुणगेकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्या अरुणा शिर्के, मनस्वी पाताडे, नंदिनी बागवे, साक्षी तर्फे, वैष्णवी पाताडे, रमिला आईर, भारती सावंत, रेश्मा पवार आदी उपस्थित होते.
गावठी बाजारात विद्यार्थ्यांनी फळे, भाज्या, सरबत व इतर वस्तूंची विक्री केली. स्वतःच हिशेब करून व्यवहार पूर्ण केले. विद्यार्थ्यांचे व्यवहारिक ज्ञान वाढविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापक नीलेश ठाकूर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com